छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसाची गुंडगिरी, डिलिव्हरी बॉयला काठी तुटेपर्यंत मारहाण

Chhatrapati Sambhajinagar Crime News : जीवन शेजवल असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर जितेंद्र असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी देण्यास उशीर झाल्याने फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला एका पोलिसाने बेदम मारहाण केली आहे. संभाजीनगरच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. काठी तुटेपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलिसांनी घेतली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जीवन शेजवल असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी याचे नाव असून, जितेंद्र असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण? 

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागात राहणारा जितेंद्र मानके हा सकाळी वृत्तपत्र घरोघरी वाटप करतो. तसेच दुपारनंतर तो फिल्पकार्टसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी पेपर वाटप करून तो पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान 12 वाजेच्या सुमारास त्याला सिडको पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जीवन शेजवलचा फोन आला. माझं पार्सल असून लवकर आणून देण्याची मागणी त्याने केली. 

( नक्की वाचा : नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार )

मात्र आणखी काही पार्सल असल्याने जितेंद्र याने येतो म्हणून सांगितले. पण जीवन सतत फोन करू लागला. त्यामुळे येतो ना रे असं जितेंद्रने म्हटलं. याचाच राग पोलीस कर्मचारी जीवनला आला. त्यामुळे त्याने डिलव्हरी करण्यासाठी आलेला जितेंद्रला आपल्या पोलीस लाठीने बेदम मारहाण केली. अंगावर वळ येईपर्यंत मारहाण केली. तसेच डोक्यात देखील रक्त निघेपर्यंत आणि तोंडातून रक्त निघेपर्यंत मारहाण केली. 

(नक्की वाचा-  'लॅटरल एन्ट्री'वरुन केंद्र सरकार एक पाऊल मागे; भरती रद्द करण्यासाठी UPSC ला पत्र)

मारहाण करणारा पोलीस निलंबित

सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जीवन शेजवल याने डिलिव्हरी बॉयला केलेल्या मारहाणीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कानावत यांनी दिली आहे.

Advertisement