राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Municipal Corporation General Assembly : नवी मुंबईत प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईमध्ये लवकरच गुरु तेग बहादूर साहेब यांच्या नावाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली होती. मात्र,हे रुग्णालय नेमके कुठे आणि कोणत्या भूखंडावर उभारले जाणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नसल्याने, या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फडणवीसांनी रुग्णालयासोबत मेडिकल कॉलेज उभारण्याचाही उल्लेख केला. मात्र, ठिकाण आणि नियोजनाबाबत माहिती नसल्याने महासभेत या विषयावर जोरदार चर्चा रंगली. महासभेत विरोधी पक्ष नेते यांनी आक्षेप घेतला.“केवळ घोषणा करून उपयोग नाही,प्रकल्पाचे ठिकाण आणि सविस्तर आराखडा स्पष्ट झाला पाहिजे,” अशी भूमिका मांडली."आम्ही असे लेखी पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांना देणार आहोत", असं त्यांनी महासभेत सांगितलं.
नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!
महासभेत वातावरण का तापलं?
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे हा मुद्दा अधिकच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर महासभेत वातावरण तापलं. धक्कादायक बाब म्हणजे, भाजपकडूनच या घोषणेवर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांनी केवळ कार्यक्रमात मोठ्या रुग्णालयाची घोषणा केली असून त्याचे सविस्तर नियोजन अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे सध्या केवळ घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत उमटले असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.