Kasgaon-Kamothe Railway News : येत्या काळात बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार आहे.कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय.या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल.याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. या शहरातील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव-कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासांत पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती.
नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!
नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झाली बैठक
नुकताच नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राम पातकर यांनी दिली आहे.हा रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा वांगणी, बदलापूर अंबरनाथ तसेच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world