रामराजे शिंदे, नवी दिल्ली
राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहेत. विविध कारणांमुळे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याच शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे. पुढील वर्षी 12 जानेवारीला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे काँग्रेसला लवकरच प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा- तुळजाभवानी मंदिर 1 जानेवारीपर्यंत 22 तास राहणार दर्शनासाठी खुले)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टर्म आधीच पूर्ण झाली आहे. त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं. त्यामुळे तटकरे यांना तुर्तास अभय मिळण्याची शक्यता आहे.