
Mumbai Water Supply : पुणेकरांनंतर मुंबईकरांवरही पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात करण्यात आली आहे. दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मुंबईत देखील येत्या काळात पाणी कपात केली जाऊ शकते. कारण मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 23 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे झपाट्याने कमी होत आहे. धरणांमधील पाणीसाठी 23 टक्क्यांवर आला आहे. मात्र अद्याप पाणीकपातीचा कोणताही विचार नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. येत्या 15 मे पर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
मागील तीन वर्षांची स्थिती
मागील तीन वर्षांचा विचार केला तर सध्या धरणातील पाणीसाठा जवळपास सारखाच आहे. 2023 मध्ये पाणीसाठी 339259 दशलक्ष लिटर, 2024 मध्ये पाणीसाठी 258988 दशलक्ष लिटर आणि 2025 हा पाणीसाठा 333718 दशलक्ष लिटर एवढा आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar:'अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, पण त्यांनी...' थेट ऑफर कुणी दिली?)
धरणांतील जलसाठा
- अप्पर वैतरणा - 43961 दशलक्ष लिटर
- मोडक सागर - 35777 दशलक्ष लिटर
- तानसा- 27750 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा- 50325 दशलक्ष लिटर
- भातसा- 163512 दशलक्ष लिटर
- विहार- 9533 दशलक्ष लिटर
- तुळशी- 2861 दशलक्ष लिटर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world