Pune News: बेशिस्त पुणेकरांना पोलिसांचा दणका, 6296 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित

Pune Traffic News: एकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर, त्यांची नावे पुणे आरटीओकडे पाठवली जातात, जिथे मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार औपचारिक निलंबनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: पुणे वाहतूक पोलीस आणि RTO ने जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत गंभीर वाहतूक गुन्ह्यांसाठी 6,296 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे आणि वेगात गाडी चालवणे यांसारख्या गंभीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली.

आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 456 लायसन्स निलंबित करण्यात आले होते, तर 2023 मध्ये ही संख्या 998 पर्यंत वाढली. 2024 मध्ये तब्बल 4,554 लायसन्स निलंबित करण्यात आले, तर 2025 च्या पहिल्या 9 महिन्यांत 744 लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. एकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर, त्यांची नावे पुणे आरटीओकडे पाठवली जातात, जिथे मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार औपचारिक निलंबनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.

(नक्की वाचा-  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची सत्वपरीक्षा! KYC साठी डोंगर चढण्याची वेळ)

पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी याबाबत म्हटलं की, "आम्ही आता वारंवार होणारे गुन्हे किंवा चालक आणि इतरांचे जीवन धोक्यात आणणारे धोकादायक वर्तन सहन करत नाही. आम्ही वाहन चालकांना आवाहन करतो की, शिक्षेच्या भीतीमुळे नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा."

(नक्की वाचा-  Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे)

दिवाळीच्या गर्दीत सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन

पुणे आरटीओने नागरिकांना दिवाळी जबाबदारीने साजरी करण्याचे आणि रस्त्यांवर सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यालयाने लोकप्रिय ठिकाणी विशेष अंमलबजावणी पथके तैनात केली आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article