जाहिरात

Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे

काँग्रेस पक्षाने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का, हाच मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.

Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे

Mumbai News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाने मित्रपक्षातील इतर कोणत्याही पक्षाशी चर्चा न करताच आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वीही काँग्रेस पक्ष अनेक पालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढला आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 93 जागा, भाजपला 82 जागा, काँग्रेसला 31 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष मित्रपक्षांची वाट न पाहता 'एकला चलो रे'चा नारा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

(नक्की वाचा- Amit Shah: मुस्लीम लोकसंख्या का वाढली? अमित शाहांनी सांगितलं कारण, 'डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट' चा दिला मंत्र)

काँग्रेस पक्षाने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का, हाच मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हे पक्ष एकत्र आहेत. मात्र, काँग्रेसच्या या एकतर्फी निर्णयामुळे आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपशी मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याचे दावे करत असली तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे अनेकदा जागावाटपावरून मतभेद निर्माण होतात.

(नक्की वाचा-  OLA Uber: ओला-उबरचे भाडे आता सरकारच्या हातात? 'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती)

काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर घटक पक्षांनीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, तर महाविकास आघाडीच्या एकजुटीवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे केवळ जागावाटपावरच नव्हे, तर महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com