जाहिरात

Pune Accident: पुण्यात 2 कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण ठार तर 20 जखमी, 15 गाड्यांना दिली धडक

दोन कंटेनरमध्ये धडक होवून हा अपघात झाला. त्यानंतर मोठी आग लागली होती.

Pune Accident: पुण्यात 2 कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण ठार तर 20  जखमी, 15 गाड्यांना दिली धडक
पुणे:

रेवती हिंगवे 

पुण्यात नवले ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. दोन कंटनेरचा हा अपघात होता. या अपघातात एक कारही सापडली होती. हा अपघात इतका भीषण होता की 7 जण जागीच ठार झाले आहेत. तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातनंतर पुणे बंगळुरू महामार्गावरी वाहतूक ठप्प झाली आहे. दोन कंटेनरमध्ये धडक होवून हा अपघात झाला. त्यानंतर मोठी आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले होते. आता आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं आहे. नवले ब्रिजवर झालेल्या या अपघातानंतर एकच धांदल उडाली. अपघाताच्या सुरूवातील पाच जण ठार झाल्याची माहिती होती. त्यानंतर हा आकडा वाढून आता सात झाला आहे.  

Latest and Breaking News on NDTV

नवले पुलावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून वाहतूक शाखेने वाहतूक वळवली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुणे बंगळुरू हायवेवर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कंटेनरला आग लागली. कंटनेर खाली अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर विरोधकांनी जोरदार टिका केली आहे.  नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा झाल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यांना त्याचे गांभिर्य नाही. राज्य सरकारच या अपघाताला जबाबदार आहे असे जगताप म्हणाले. तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आहेत. या अपघातात दोन कंटेनरमध्ये एक कार अडकली होती. त्यात काही लोक होते. त्यांना ही बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं. या कारलाच आग लागली.  

नक्की वाचा - Trending News: आता 'या' मुलांना वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम, कंपनी स्वत: डिलीट करणार अकाउंट

कारचा या अपघातात चुराडा झाला आहे. याशिवाय अन्य गाड्यांना ही याचा फटका बसला. दोन कंटेनरमध्ये धडक झाली, त्यानंतर  आग लागली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकचा ब्रेकफेल झाला होता असं प्रत्यक्षदर्शिने सांगितले. त्यानंतर हा ट्रकने  पिकअपला धडक दिली. त्यात पिकअप पलटी झाला. त्यानंतर कंटनेर अनेक गाड्यांना धडकत धडकत पुढे आला. त्यानंतर कारवर आदळला. क्लिनर तर गाडीतच जिवंत जळला असं प्रत्यक्षदर्शिने सांगितलं. 

नक्की वाचा - Foreign Travel: परदेशवारी करा फक्त 1000 रूपयात! कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी 'हे' 3 सुंदर देश

पुण्याचे डीसीपी  संभाजी कदम यांनी काही माहिती एनडीटीव्ही मराठीला दिली आहे. ते म्हणाले. ट्रकचा ब्रेक फेल झाला होता. सातारा पुणे मार्गावर हा अपघात झाला. या ट्रकने पंधरा ते वीस गाड्यांना धडक दिली आहे. त्यानंतर तो छोट्या कारला धडकला. त्याचाच स्फोट झाला असं कदम म्हणाले. या कारमधील लोकांचा मृत्यू झाला आहे असं कदम यांनी सांगितलं. काही जण कारमध्ये अकडले होते. त्यांनाही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सुरूवातीला पाच जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. काही जण गंभीर जखमी असल्याचं ही त्यांनी सांगितलं. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com