Pune News: कोरेगाव पार्कमध्ये पार्टी केली, घरी परताना धावत्या कारमध्येच वकील तरुणी सोबत 3 जणांनी...

हे प्रकरण समोर येताच सर्वच जण हादरून गेले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमधून पार्टी केल्यानंतर महिला वकिलाचा धावत्या कारमध्ये विनयभंग
  • पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे
  • पीडित महिला वकील पार्टीनंतर एका अनोळखी कारमध्ये बसली आणि कारमध्येच विनयभंग करण्यात आला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

यशपाल सोनकांबळे 

एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातून एक लाजीरवाणी आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमधून पार्टी करून परतणाऱ्या महिला वकिलाचा धावत्या कारमध्ये विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण समोर येताच सर्वच जण हादरून गेले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला वकील काल रात्री तिच्या 3 मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्क येथील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. तिथून त्या सर्व जणी दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान, पीडित महिलेच्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या. महिला तिथे एकटीच असल्याचे पाहून 2 अनोळखी व्यक्तींनी तिला घरी सोडण्याचा बहाणा केला.  तिला विश्वासात घेऊन कारमध्ये बसवले. तिने ही विश्वास ठेवला आणि ती त्या कारमध्ये बसली. 

Advertisement

नक्की वाचा - NEET Paper Leak: 'सर्व 180 प्रश्न आमच्याच स्टडी मटीरिअलमधून', स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक सत्य उघड

रात्री जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास कार सुरू असताना या दोघांनी धावत्या गाडीतच महिला वकिलाचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. या प्रकरणाची माहिती देताना पुणे शहर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, "महिला वकिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नक्की वाचा - Shocking: अजब पोलीसांचा गजब तर्क!'गाडीत डिझेल नाही, हरवलेल्या मुलीला शोधता येणार नाही' कुटुंबीयांचा संताप

शिवाय आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत." या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात महिला सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. शिवाय ती कोरेगाव पार्क सारख्या भागात घडली आहे. त्यामुळे ते जास्त गंभीर समजले जाते. कारण पुण्यातील हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो. मात्र तिथे ही अशी घटना घडली आहे.