जाहिरात

NEET Paper Leak: 'सर्व 180 प्रश्न आमच्याच स्टडी मटीरिअलमधून', स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक सत्य उघड

नाशिक आणि लातूर शाखेतून सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे 'पक्के अश्युरन्स' विद्यार्थ्यांना दिले जात होते.

NEET Paper Leak: 'सर्व 180 प्रश्न आमच्याच स्टडी मटीरिअलमधून', स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक सत्य उघड
  • सीबीआयने लातूर येथील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला पेपर लीक प्रकरणात अटक केली आहे
  • नाशिक शाखेतील मॅनेजरने स्टिंग ऑपरेशनमध्ये सर्व प्रश्न त्यांच्या स्टडी मटीरिअलमधून येतात असा दावा केला
  • आरसीसीतर्फे पेपर लीक प्रकरणातील आरोपींना कोचिंग देऊन १०० टक्के प्रश्नांची हमी दिली जात असल्याचे समोर आले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

राहुल वाघ 

NDTV Marathi Sting Operation: वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने (CBI) लातूर येथील प्रसिद्ध 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस' (RCC) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता 'आरसीसी'च्या नाशिक शाखेच्या मॅनेजरने 'एनडीटीव्ही'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. "नीट परीक्षेतील 180 पैकी 180 प्रश्न आमच्याच स्टडी मटीरिअलमधून येतात", असा दावा या मॅनेजरने कॅमेऱ्यासमोर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 

स्टिंग ऑपरेशनमध्ये सत्य उघड
'आरसीसी' कोचिंग इन्स्टिट्यूटचे वास्तव जाणून घेण्यासाठी 'एनडीटीव्ही'ने छुप्या कॅमेऱ्याद्वारे (Hidden Camera) हे स्टिंग ऑपरेशन केले होते. पेपर लीक प्रकरणातील आरोपींना 'आरसीसी'तर्फेच कोचिंग दिले जात होते. नीट परीक्षेत 100% प्रश्न त्यांच्याच स्टडी मटीरिअलमधून येतील, अशी खात्री दिली जात होती. शिवराज मोटेगावकर हा पेपर लीक करणाऱ्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य असून, परीक्षेपूर्वीच त्याच्याकडे नीटचा संपूर्ण पेपर आल्याचा संशय आहे.

देशातील सर्वोत्तम निकालाचा दावा
स्टिंग दरम्यान मॅनेजरने सांगितले, "आमचे रिझल्ट संपूर्ण भारतात सर्वोत्तम आहेत. तुम्ही एम्स (AIIMS) किंवा कोणत्याही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जा, तिथे तुम्हाला आरसीसीचा किमान एक तरी विद्यार्थी नक्कीच मिळेल. आमचा पासिंग रेट देशात सर्वाधिक आहे." एवढेच नव्हे तर, मागील नीट परीक्षेतील प्रश्न आरसीसीच्या स्टडी मटीरिअलमधील प्रश्नांशी तंतोतंत कसे जुळतात, याचे पुरावे आणि पेज नंबर पालकांना दाखवण्यासही आम्ही तयार आहोत, असेही त्याने एका पुस्तकाकडे बोट दाखवत सांगितले.

'रिझल्ट'च्या नावाखाली मोठा गैरव्यवहार?
मॅनेजरच्या या दाव्यांमुळे आता कोचिंग विश्वात खळबळ उडाली आहे. 100% यशाची आणि प्रश्नांची हमी देणाऱ्या या कोचिंग नेटवर्कच्या मागे पेपर लीकचे मोठे रॅकेट कार्यरत होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक आणि लातूर शाखेतून सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे 'पक्के अश्युरन्स' विद्यार्थ्यांना दिले जात होते.

मोटेगावकरला अटक का झाली?
सीबीआयने सोमवारी शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला अटक केली. रविवारी घेतलेल्या झडतीदरम्यान सीबीआयला मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळून आली होती. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वीच त्याला नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरे मिळाली होती.  ती त्याने अनेकांना फॉरवर्ड केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com