देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यात वारंवार गुन्हेगारीसंदर्भातील वृत्त समोर येत आहेत. आता तर थेट शेतातून शेतकऱ्याचं पिक गायब झाल्याचा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शेतातील उभं पिक गायब...
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी काढणीस आलेलं शेतकऱ्याचे लसणाच्या पिकाची चोरी केली. बेलसर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. वाळत घातलेले धान्य, वैरणीच्या पेंढ्या आणि गावरान लसणाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुरंदर तालुक्यातील शहाजी धोंड यांच्या शेतात लसणाचे पीक काढणीस आलं होतं. मात्र अज्ञात चोरट्याने एका रात्रीत हे लसणाचे पीक भुईसपाट केलं. यात धोंड यांचं जवळपास 15 हजार रुपयांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यातून होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world