तारेवर टॉवेल वाळत घालताना भालेकर कुटुंबाचा शेवट, पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू!

एक थरकाप उडवणाऱ्या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

एक थरकाप उडवणाऱ्या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती ओला टॉवेल वाळत घालत होती, तेव्हा विजेचा झटका लागला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नीही जवळ गेली तिलाही विजेचा धक्का बसला. आपल्या आई-वडिलांची अशी अवस्था पाहून त्यांचा मुलगा मदतीसाठी पुढे आला, तोही स्वत:ला वाचवू शकला नाही आणि विजेचा झटका बसला. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. 

पुण्यातील दापोडीतील धक्कादायक घटना...
मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ही घटना पुण्यातील दौंड तालुक्यात सोमवारी घडली. येथे एक कुटुंब पत्र्याच्या घरात राहत होतं, त्यांच्या घराला लागूनच विजेचा खांब होता. पत्र्याचं छप्पर असल्याकारणाने त्यात करंट आला आणि कपडे वाळत घालणाऱ्या तारेपर्यंत पोहोचला. या कुटुंबातील केवळ मुलगी बचावली आहे. ज्यावेळी ही घटना घडली बाहेर होती. 

विजेच्या धक्क्याने कुटुंबातील तिघांचा मृत्यू...
या दुर्घटनेत सुरेंद्र देविदास भालेकर (44), त्यांची पत्नी आदिका भालेकर (38) आणि मुलगा प्रसाद भालेकर (17) यांचा मृत्यू झाला आहे.  दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेकर कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील असून गेल्या पाच वर्षांपासून ते दापोडीत राहत होते. ते येथे भाड्याच्या घरात राहत होते. या परिसरात अनेकजणं घर भाड्याने घेऊन राहतात. सुरेंद्र भालेकर बांधकाम मजुराचं काम करीत होते. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. दोनपैकी एक मुलगा दुसऱ्या गावात तर प्रसाद बारावीत होता. आदिका भालेकर गावात शेतात काम करीत होती. 

नक्की वाचा - पत्रक, स्कॅनर, बायबल अन् पाच महिला; पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

भालेकर राहत असलेल्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सहा फूट उंचीचे वीट बांधकाम आणि त्यावर साडेतीन फूट उंचीचे पत्र्याचे कंपाऊंड आहे. त्यांच्या शेजाराच्या घराला वीजपुरवठा करणारी सर्व्हिस वायर  भालेकरांच्या घरावरून गेली आहे. त्या खांबावरील सर्व्हिस वायरमधून भालेकर यांच्या घरात वीजप्रवाह उतरला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Advertisement

त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस आणि सोसाऱ्याचा वारा वाहत होता. सुरेंद्र भालेकर आंघोळ करून बाहेर आले आणि पत्र्याला लागून असलेल्या अँगलला बांधलेल्या तारेवर टॉवेल टाकत असताना या तारेत उतरलेल्या वीजेच्या प्रवाहाने त्यांना शॉक लागला. यावेळी त्यांची पत्नी बचाव करायला पुढे आली, तिलाही विजेचा झटका बसला. आई-वडिलांना या अवस्थेत पाहिल्यानंतर मुलगा प्रसादही पुढे आला. या घटना तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.