अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Viral Video : पावसाळा सुरू झाला की नदी-ओढ्यांमध्ये खेकडे पकडण्यासाठी अनेक जण उतरतात.पण हे काम अधिक सोपे,जलद आणि परिणामकारक कसे करता येईल,याचा विचार करत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी गावातील तरुण विनायक केदारी याने आपल्या कल्पकतेतून खेकडे पकडण्याचा एक खास पिंजरा तयार केला आहे.छोट्याशा प्रयोगातून सुरू झालेल्या या कल्पनेला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला असून सोशल मीडियामुळे त्याच्या व्यवसायालाही नवी दिशा मिळत आहे.
पिंजऱ्यात एक-दोन किलो खेकडे सहज अडकतात
कबाडवाडीसारख्या छोट्याशा गावात राहणारा विनायक केदारी हा व्यवसायाच्या शोधात असताना त्याच्या नजरेसमोर खेकडे पकडणाऱ्या लोकांच्या अडचणी आल्या.त्यातूनच त्याने कमी खर्चात,वापरण्यास सोपा आणि अधिक खेकडे पकडता येतील असा खास पिंजरा तयार केला.हा पिंजरा नदी,ओढे,नाले किंवा पाणथळ भागात लावल्यानंतर त्यामध्ये सहजपणे एक ते दोन किलोपर्यंत खेकडे अडकतात,असा त्याचा दावा आहे.त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळेत अधिक खेकडे पकडणे शक्य होत असल्याने या पिंजऱ्याची मागणी वाढत आहे.
नक्की वाचा >> Thane News: ठाण्यात 'या'भागात परप्रांतीयांची दहशत? मराठी तरूणावर केला हल्ला, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू
विनायकने आपल्या पिंजऱ्याचे प्रात्यक्षिक दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रासह इतर भागांतूनही त्याच्याशी संपर्क साधला जाऊ लागला.
आता या छोट्या उद्योगाला ऑनलाइन स्वरूप देण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे.मोठे उद्योग उभारण्यासाठी नेहमी मोठी गुंतवणूकच लागते असे नाही,तर एखादी साधी कल्पना,मेहनत आणि आधुनिक माध्यमांचा योग्य वापर यामुळेही यशाचा मार्ग खुला होऊ शकतो,हे विनायक केदारीची ही यशोगाथा अधोरेखित करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world