रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Crime News Today : ठाणे शहरातील ढोकाळी परिसरात किरकोळ कारणावरून एका मराठी तरुणावर परप्रांतीय व्यक्तीने कथितरित्या हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.या हल्ल्यात तरुणाच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमधील वादाच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन्..
यापूर्वी परप्रांतीय ओला चालकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता मराठी तरुणावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुणे शहरातील 'या' प्रमुख रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्यात लांबच लांब रांगा
आरोपीविरोधात कारवाईची मागणी
हल्ल्यामागील नेमके कारण,संबंधित आरोपीची भूमिका आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत अधिक माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.या घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून आरोपीविरुद्ध कोणती कारवाई केली जाते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Dombivli News: पावासाचा फायदा घेत डोंबिवलीत पाच चोरांची टोळी सक्रिय, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, CCTV Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world