Pune News:सियाच्या अफेयरची घरातील मंडळींना होती कल्पना, 35 वर्षांच्या मैत्रीमध्ये कुणी कालवलं विष? वाचा...

Lohagad Fort Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Lohagad Fort Murder Case:  सियाच्या घरातील दोन व्यक्तींना तिच्या अफेयरची कल्पना होती.
पुणे:

Lohagad Fort Murder Case:  पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या मुलीसोबत काही महिन्यांत थाटामाटात लग्न होणार होते, तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर आता दोन्ही कुटुंबांमधील जुने संबंध आणि हत्येनंतरची आरोपी मुलीची प्रतिक्रिया समोर आली असून, ती ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. केतनचा मृतदेह समोर आल्यानंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने दिलेली प्रतिक्रिया आणि या दोन कुटुंबांचे नाते कसे जुळले होते, याबद्दल केतनच्या वडिलांनी आणि आजोबांनी अत्यंत खळबळजनक खुलासे केले आहेत.

लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी घडलेल्या या थरारानंतर सुरुवातीला हा अपघात वाटत होता. मात्र, पोलीस जेव्हा केतनचा मृतदेह घेऊन समोर आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सियाच्या चेहऱ्यावर दुःखाचा एकही भाव नव्हता. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती किंवा जराही रडू कोसळले नाही. तिचे हे शांत राहणे आणि चेहऱ्यावरील निर्विकार भाव पाहूनच केतनच्या कुटुंबियांना पहिल्यांदा मोठा संशय आला, अशी माहिती केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिली आहे.

Advertisement

35 वर्षांची मैत्री आणि....

केतनच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल कुटुंब आणि सियाचे कुटुंब एकमेकांना गेल्या 35 वर्षांपासून ओळखत होते. इतके जुने आणि कौटुंबिक संबंध असल्यामुळेच हे लग्न ठरवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, सियाचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत, याची पूर्ण कल्पना तिच्या काकांना आणि मावशीला होती. तरीही त्यांनी या प्रेमसंबंधांची गोष्ट लपवून ठेवली आणि केतनसोबत लग्न लावून देण्यासाठी प्रचंड दबाव आणला. आमच्या इतक्या जुन्या मैत्रीचा त्यांनी असा विश्वासघात कसा केला, असा संतप्त सवाल आता केतनच्या आजोबांनी उपस्थित केला आहे.

( नक्की वाचा : Pune : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग )

केतन आणि सिया यांचा साखरपुडा याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. पिंपरी-चिंचवडमधील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतनच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे हे भव्य लग्न होणार होते. 

जयपूरमधील एक आलिशान महाल तब्बल 17 कोटी रुपये देऊन बूक करण्यात आला होता. इतकेच नाही तर पाहुण्यांना आणण्यासाठी 2 खासगी विमानांची (प्रायव्हेट जेट) व्यवस्था देखील करण्यात आली होती. दोन्ही कुटुंबे खूप आनंदी होती, पण या आनंदाचे रूपांतर अचानक अत्यंत भीषण दुर्घटनेत झाले.

( नक्की वाचा : School Teacher: शिक्षिकेचे विद्यार्थ्याशी संबंध, VIDEO हाती लागताच मुलांनी ब्लॅकमेल करून मागितली एकच गोष्ट )

वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच...

सियाने तिच्या वाढदिवसाच्या  1 दिवस आधी केतनकडे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट धरला होता. तिच्या आनंदासाठी केतनने देखील होकार दिला. तिथे गेल्यावर सियाने सुरुवातीला कुटुंबियांना सांगितले की, फोटो काढताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. मात्र, पोलिसांच्या तपासात सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला 500 फूट खोल दरीत ढकलल्याचे समोर आले. तब्बल 3 तासांच्या मोठ्या ऑपरेशननंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

Advertisement

या संपूर्ण प्रकरणावर केतनचे काका विजय अग्रवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आमच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा आमच्याकडून हिरावून घेतला आहे, त्यामुळे आरोपींना थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 

Topics mentioned in this article