Pune News: पुण्यातील एका तरुणाने आणि त्याच्या मित्राने रात्री 3 वाजता स्वतःच्याच बाल्कनीत अडकल्यानंतर सुटकेसाठी लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पालकांना न उठवता घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी चक्क Blinkit डिलिव्हरी बॉयची मदत घेतली आणि एका मोठ्या संकटातून स्वतःची हसता हसता सुटका करून घेतली.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील मिहीर गाहुकर याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याचे कॅप्शन आहे, "आम्ही रात्री 3 वाजता आमच्याच बाल्कनीत अडकलो होतो, मग आम्ही हे केलं." मिहीर आणि त्याचा मित्र काही कारणास्तव बाल्कनीत आले असताना चुकून दरवाजा लॉक झाला. घरात आई-वडील झोपलेले होते, त्यांना उठवले असते तर मध्यरात्री मोठा गोंधळ आणि ओरडा नक्की होता. त्यामुळे त्यांनी शांतपणे घरात शिरण्यासाठी एक अनोखा प्लॅन आखला.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
डिलिव्हरी बॉयची मदत
बाल्कनीत अडकलेल्या या मित्रांनी तातडीने Blinkit वरून काहीतरी ऑर्डर केले. डिलिव्हरी एजंट इमारतीपाशी पोहोचल्यावर त्यांनी त्याला फोन केला आणि आपली विचित्र परिस्थिती समजावून सांगितली. व्हिडिओमध्ये मिहीर डिलिव्हरी बॉयला सूचना देताना दिसतोय.
- घराची चावी कुठे ठेवली आहे?
- मुख्य दरवाजा कसा उघडायचा?
- घरात शिरल्यानंतर शांतपणे बाल्कनीकडे कसे यायचे?
(नक्की वाचा- Akola News: अकोला हादरले! काँग्रेसच्या बड्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या)
सुटकेनंतरचा आनंद
काही वेळातच तो डिलिव्हरी बॉय घराचा दरवाजा उघडून बाल्कनीपर्यंत पोहोचला. त्याला पाहताच या दोन्ही मित्रांना हसू अनावर झाले. "आई-वडील उठले असते आणि त्यांनी डिलिव्हरी बॉयला घरात पाहिले असते, तर काय झाले असते?" अशा मजेशीर कमेंट्स आता या व्हिडिओवर येत आहेत.