Pune Mahapalika Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळची निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून अनेक स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. विशेषतः 15 प्रभागांमध्ये होणाऱ्या 'हाय-व्होल्टेज' लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. धंगेकर, बिडकर, आंदेकर, जगताप आणि बालवडकर यांसारख्या बड्या नेत्यांनी आपल्या प्रभागांत ताकद झोकून दिली आहे.
चौरंगी आणि पंचरंगी लढतींचे आव्हान
पुणे महापालिकेत यावेळेस अनेक प्रभागांमध्ये पारंपरिक दोन पक्षांमधील लढत न होता, ती चौरंगी किंवा पंचरंगी होताना दिसत आहे. काही ठिकाणी माजी नगरसेवक समोरासमोर ठाकले आहेत, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरीने गणिते बिघडवली आहेत. बंडखोर उमेदवारांनी अन्य पक्षांची साथ घेतल्याने किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
पुणे महानगरपालिका निवडणुकीत असणाऱ्या एकूण 15 हायहोल्टेज लढती
1 - प्रभाग 5- (कल्याणीनगर - वडगाव शेरी)
नारायण गलांडे (भाजप) विरुद्ध सचिन भगत (राष्ट्रवादी)
2 - प्रभाग 7 - (गोखलेनगर- वाकडेवाडी)
रेश्मा भोसले (भाजप) विरुद्ध दत्ता बहिरट (राष्ट्रवादी)
3 - प्रभाग 8 - (औंध, बोपोडी)
सनी निम्हण (भाजप) विरुद्ध प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी)
4 - प्रभाग 9 - (सूस, बाणेर, पाषाण)
गणेश कळमकर (भाजप) विरुद्ध बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी)
5 - प्रभाग 9 - (सूस, बाणेर, पाषाण)
लहू बालवडकर (भाजप) विरुद्ध अमोल बालवडकर (राष्ट्रवादी)
6 - प्रभाग 12 - (शिवाजीनगर, मॉडेल कॉलोनी)
निवेदिता एकबोटे (भाजप) विरुद्ध बाळासाहेब बोडके (राष्ट्रवादी)
7 - प्रभाग 14 - (कोरेगाव पार्क, मुंढवा)
उमेश गायकवाड (भाजप) विरुद्ध सुनील ऊर्फ बंडू गायकवाड (राष्ट्रवादी) विरुद्ध बाबू वागस्कर (मनसे)
8 - प्रभाग क्रमांक 18 - (वानवडी-साळुंखेविहार)
प्रशांत जगताप (काँग्रेस) विरुद्ध अभिजित शिवरकर (भाजप)
9 - प्रभाग 24 - (कसबा, कमला नेहरू रुग्णालय)
गणेश बिडकर (भाजप) विरुद्ध प्रणव धंगेकर (शिवसेना शिंदे गट)
10 - प्रभाग 36 - (सहकारनगर, पद्मावती)
सुभाष जगताप (राष्ट्रवादी) विरुद्ध वीणा गणेश घोष (भाजप)
11 - प्रभाग 36 - (सहकारनगर, पद्मावती)
महेश वाबळे (भाजप) विरुद्ध आबा बागूल (शिवसेना)
12 -प्रभाग 38 - (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज)
दत्तात्रेय धनकवडे (राष्ट्रवादी) विरुद्ध संदीप बेलदरे (भाजप)
13 - प्रभाग 38 - (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज)
प्रकाश कदम (राष्ट्रवादी) विरुद्ध वसंत मोरे (शिवसेना - ठाकरे सेना) - विरुद्ध स्वराज बाबर (शिवसेना) -व्यंकोजी खोपडे (भाजप)
14 - प्रभाग 40 - (कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी)
रंजना टिळेकर (भाजप) विरुद्ध गंगाधर बधे (राष्ट्रवादी)
15 - प्रभाग 23 - ( नाना पेठ, रविवार पेठ)
प्रतिभा धंगेकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world