Sahyadri Hospital Pune: मराठी माणसे जाऊन राज्याबाहेरची माणसे कशी आली? सह्याद्री हॉस्पिटलबाबतचे गूढ आणखी वाढले

Sahyadri Hospitals Acquisition: मणिपाल हॉस्पिटल्सने पुणेस्थित सह्याद्री हॉस्पीटल्सची साखळी, ग्लोबल इन्व्हेस्टर ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्डाकडून सुमारे 6,400 कोटी रुपयांना विकत घेत असल्याची घोषणा 9 जुलै रोजी केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

Sahyadri Hospital Pune: पुण्यातील आघाडीची खासगी रुग्णालय साखळी सह्याद्री हॉस्पिटल्स (Sahyadri Hospitals) साखळी विकत घेण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल्स (Manipal Hospitals) समूहाशी व्यवहार झाला होता. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी या व्यवहारानंतर काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी आणखी एका मुद्दावर बोट ठेवत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.पुणे महापालिकेने गरजू रुग्णांसाठी कोकण मित्र मंडळ या संस्थेला 99 वर्षांसाठी केवळ 1 रुपया दराने ही जागा दिली होती. कोकण मित्र मंडळाने या जागेवर सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने डेक्कन येथे रुग्णालय चालवले होते. कोकण मित्र मंडळाच्या विश्वस्त मंडळात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाल्याचे दिसून आले होते. पूर्वी या मंडळात मराठी व्यक्ती होत्या, परंतु सध्या महाराष्ट्राबाहेरील व्यावसायिक कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींचा यात समावेश झाल्याचे कोंढरे यांनी म्हटले आहे. या सगळ्या घडामोडींबाबत सह्याद्री हॉस्पिटलची बाजूही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असून, ती सदर बातमी प्रसिद्ध होईपर्यंत हाती आली नव्हती. 

( नक्की वाचा: महापालिकेने भाड्याने दिलेली जागा सह्याद्री हॉस्पिटलने विकली? )

आक्षेपांप्रकरणी चौकशीची मागणी 

राजेंद्र कोंढरे यांनी NDTV मराठीशी बोलताना म्हटले की, कोकण मित्र मंडळ संस्थेशी संबंधित नसलेले, कॉर्पोरेट जगाशी संबंधित आणि कोकण किंवा पुण्याचा संबंध नसलेले लोक अचानक या संस्थेचे विश्वस्त कसे झाले? हे एक कोडे आहे. त्यामुळे याची चौकशी झाली तर सत्यपरिस्थिती उजेडात येईल असे कोंढरे यांचे म्हणणे आहे. हा सगळा प्रकार धर्मादाय रुग्णालये अप्रत्यक्षपणे व्यावसायिकांच्या हातात देण्याचा एक नवीन मार्ग निर्माण करण्याचा प्रकार तर नाही ना? असाही प्रश्न विचारला जात आहे. या सगळ्या प्रकारानंतर सामान्य,गरजू जनतेला अत्यल्प दरात उपचार मिळतील का? असाही प्रश्न विचारला जात आहे.  

Advertisement

( नक्की वाचा: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )

'सह्याद्री'साठी 6,400 कोटींचा व्यवहार

मणिपाल हॉस्पिटल्सने पुणेस्थित सह्याद्री हॉस्पिटल्सची साखळी, ग्लोबल इन्व्हेस्टर ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्डाकडून सुमारे 6,400 कोटी रुपयांना विकत घेत असल्याची घोषणा 9 जुलै रोजी केली होती. या अधिग्रहणामुळे मणिपालच्या रुग्णालयांची एकूण बेड संख्या सुमारे 12,000 पर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या रुग्णालय नेटवर्क्सपैकी एक बनेल असा दावा केला जात आहे. या अधिग्रहणामुळे मणिपाल हॉस्पीटलच्या नेटवर्कमध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड येथील 11 रुग्णालये जोडली जातील, ज्यामुळे त्यांच्या एकूण रुग्णालयांची संख्या 49 होईल. 

Advertisement
Topics mentioned in this article