रेवती हिंगवे
आयुष उर्फ गोविंद कोमकर हत्येनं पुणे हादरलं आहे. ही हत्या झाली त्या आधी काय झालं याचा घटनाक्रम आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी सांगितला आहे. त्यावेळी त्यांना त्यांचे आश्रू अनावर झाले. त्यांनी हंबरडा फोडला. शिवाय या हत्ये मागे आपले वडील आणि आयुषचे आजोबा बंडू आंदेकर हेच असल्याचा आरोप केला आहे. शिवाय पोलिस नक्की काय करत होते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांना अंबेगावमध्ये टीप मिळाली होती तरी त्यांनी पुढची कारवाई चोख पणे का केली नाही असा प्रश्नही या निमित्ताने कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला आहे. NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. शिवाय हत्येचा आधी काय काय घडलं याचा थरार ही त्यांनी सांगितला आहे.
गणेशोत्सवाचं वातावरण होतं. शनिवारी विसर्जन होणार होतं. शुक्रवारी नेहमी प्रमाणे आयुष हा त्याच्या लहना भावाला क्लासला सोडायला गेला होता. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला होता. तिथून त्याने भावाला घेतलं आणि घरी यायला निघाला होता. त्याच वेळी त्याने आई कल्याणी यांना फोन केला असं त्या सांगतात. त्यावर त्याने गणपतीसाठी हार आणू की प्रसाद आणू असं विचारलं. त्यावर आपण त्याला हार आण असं सांगितल्याचं कल्याणी सांगतात. त्यानंतर त्याने फोन ठेवला. तोच त्याचा शेवटचा फोन होता असं कल्याणी सांगतानाच त्यांनी आपल्या आश्रूंनाही वाट करून दिली.
फोन ठेवल्यानंतर आयुष लहान भावासह बिल्डींगच्या पार्कींगमध्ये पोहोचला. त्याने त्याची गाडी पार्क केली. गाडीची चावी काढली आणि तो मागे वळला. त्याच वेळी तिथे असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी थेट त्याच्या मानेत घुसली. हे सर्व त्याच्या लहान भावाने पाहीले. त्यानंतर कल्याणी यांना बिल्डींगमधला लोकांनी फायरींग झाली आहे असं फोन करून कळवलं. फायरींग झाली आहे म्हणजे ती आयुषवरच झाली असणार असा अंदाज आपल्याला आला असं कल्याणी यांनी सांगितलं. त्यानंतर धावत मुलीसह आम्ही पार्कींगमध्ये पोहोचलो. तिथं जे पाहीलं त्याने आपण सुन्न झालो. आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. माझा लहान मुलगा मदतीसाठी ओरडत होता. कुणी तरी वाचवा अशी याचना करत होता. पण कोणी पुढे आलं नाही असं कल्याणी यांनी सांगितलं.
त्यानंतर आम्हीच पोलिसांना फोन केला. रुग्णवाहीका बोलवली. पण जवळपास पाऊण तास कोणीच आलं नाही. तो पर्यंत आयुष तयाच पडून होता. मला काहीच सुधरत नव्हतं असं कल्याणी यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसा आले. आयुषला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषीत करण्यात आलं. त्याने आम्हाला धक्का बसला. आयुषचं कुणा सोबतही वैर नव्हतं. तरीही त्याचा मर्डर केला गेला. हे सर्व कृत्य आपले वडील आणि आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांनीच केले असल्याचा आरोप कल्याणी यांनी केला आहे. ज्या मुलांनी हा मर्डर केला ही आंदेकरांचीच माणसं आहेत. ती त्यांच्या बरोबर वेळोवेळी दिसून आली आहेत. मर्डर करण्याच्या काही दिवस आधी ते आमच्या बिल्डींगमध्ये दिसली होती असं ही कल्याणी यांनी सांगितलं.
बंडू आंदेकर हे या खूनाशी आपला काही संबंध नाही. मी माझ्या नातवाला का मारू असं सांगत आहेत. मग गेल्या पाच वर्षात त्यांना आपल्या नातवाची आठवण का झाली? ती आताच कशी झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही नाही तर मग माझअया मुलाला कुणी मारलं अशी विचारणा ही त्यांनी केली. हे सर्व आंधेकरांनीच केलं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. वनराज आंधेकरच्या खूनामध्ये आपल्या कुटुंबीयांना गोवलं गेलं. घरातल्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं. गेल्या एक वर्षापासून ते न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. माझ्या नवऱ्याची सर्वा कामं याच लोकांनी काढून घेतली होती. आयुषचा मर्डर करणारी माणसं ही त्यांचीच आहेत. हे त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं असं ही त्यांनी विचारलं. सोनाली आंदेकरला ही अटक करा अशी मागणी त्यांनी केली. माझ्या मुलाचं कुणा बरोबर ही वैर नव्हतं. पाच वर्षानंतर तुम्हाला माझा मुलगा आठवला का असं ही त्या म्हणाल्या. भांडणं मोठ्यांची होती लहान मुलांचं त्यात काय चुकलं असं ही त्या म्हणाल्या.
दरम्यान कल्याणी कोमकर यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये मी जी नावं दिली त्यानुसार फिर्याद नोंदवली गेली. त्यावेळी आपली मनस्थिती नव्हती. आपल्याला आणखी काही नावं द्यायची आहेत. पण पोलिसा टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही पोलिस आयुक्तांनाही भेटोलो आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी आमची मागणी आहे. माझ्या बाकीच्या मुलांच्या जीवाला ही धोका आहे असं ही त्या म्हणाल्या. आम्ही आता जीव मुठीत घेवून जगत आहोत. बंडू आंदेकरला शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी केला. पोलिसांना माहित होतं की अंबेगावला एक कट उधळला गेला आहे. त्याच वेळी त्यांनी आमच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला पाहीजे होती. पण त्यांनी तसं केलं नाही. आमच्या घरात कर्ता कोणी नाही. सर्व जण जेलमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. तरी ते शिक्षा भोगत आहेत. हा आमच्यावर मोठा अन्याय झाला आहे असं ही त्या म्हणाल्या.