Pune Election 2025: पुण्यात 'दादां'चीच हवा! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी झेप

Pune News: बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही काही जागांवर आपले वर्चस्व राखलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Twitter- @AjitPawarSpeaks

Pune Election 2025: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मोठं यश संपादन केलं आहे. जिल्ह्यातील एकूण 17 महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी 9 जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या विजयाची बातमी समजताच पुण्यातील बारामती हॉस्टेल बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. विशेष म्हणजे, अजित पवार सध्या याच ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि मुलाखती घेत आहेत.

विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार अजित पवारांची भेट घेण्यासाठी बारामती हॉस्टेलवर गर्दी करत आहेत. आगामी काळातील विकासकामे आणि नगरपरिषदेतील सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी पवारांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घातले आहे.

(नक्की वाचा-  Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो')

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निहाय नगराध्यक्ष आणि पक्ष

  1. बारामती - सचिन सातव - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  2. लोणावळा- राजेंद्र सोनवणे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  3. तळेगाव दाभाडे - संतोष दाभाडे - भारतीय जनता पक्ष (BJP)
  4. दौंड- दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  5. चाकण- मनीषा गोरे - शिवसेना
  6. शिरूर - ऐश्वर्या पाचरणे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  7. इंदापूर - भरत शाह - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  8. सासवड- आनंदी काकी जगताप भारतीय जनता पक्ष (भाजप)
  9. जेजुरी - जयदीप बारभाई- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  10. भोर - रामचंद्र आवारे- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  11. आळंदी - प्रशांत कुराडे - भारतीय जनता पक्ष (BJP)
  12. जुन्नर - सुजाता काजळे - शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
  13. राजगुरुनगर - मंगेळ गुंडा - शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
  14. वडगाव मावळ - आंबोली ढोरे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  15. मंचर- राजश्री गांजले - शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
  16. माळेगाव- सुयोग सातपुते - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  17. उरुळी फुरसुंगी - संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

(नक्की वाचा- Amravati Election: चिखलदऱ्यात काँग्रेसचा भाजपला धक्का, शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड)

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही काही जागांवर आपले वर्चस्व राखलं आहे.

Topics mentioned in this article