Pune News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीला काल रात्री पुण्याच्या जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ मे रोजी रात्री साधारण ९ ते ९.३० दरम्यान घडली. अभय छाजेड पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी पिरंगूट भागात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
अभय छाजेड हे पुण्यातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि सक्रिय नेते आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असून ते पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world