जाहिरात

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचा नामांतराचा वाद; मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर राजकारण पेटलं

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या , “कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे.

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचा नामांतराचा वाद; मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर राजकारण पेटलं

Pune News : पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर असून या शहराला अनेक वारसे असे लाभले आहेत. पुणे शहराचा इतिहास आहेच पण प्रत्येकजण आपआपल्या परीने याला कुठे ना कुठे बदलण्याचा प्रयत्न करत आहे, हे अगदी स्पष्टपणे दिसून येत. रायगड किल्ल्यावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून दोन समाजात वादाची ठिणगी पडली होती.  आता एक नवीन चर्चा पुणे शहरात सुरू झाली आहे आणि ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची. 

दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे शहरात रेल्वेची पश्चिम विभागाची बैठक पार पडली. जिथे पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी केली. त्यांनी अशी भूमिका मांडली की पुणे जंक्शन या नावातून पुणे शहराचा इतिहास डोळ्यासमोर येत नाही. बाजीराव पेशव्यांचं पुण्यासाठी योगदान मोठं आहे आणि त्यांचं नाव पुणे रेल्वे स्थानकाला दिलं तर त्यातून पुणे शहराचा मोठा इतिहास डोळ्यासमोर येईल. 

(नक्की वाचा-  Pune News: महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन; भाजप नेत्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल)

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या , “कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी केली आहे.” 

तर दुसरा मुद्दा मांडताना मेधा कुलकर्णी इतिहासावर भर देत म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसेच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे. या कामात बाजीराव पेशवे यांचं देखील योगदान मोठे आहे. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले आणि एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात.”

हे असताना विविध स्थरावरून मेधा कुलकर्णी यांच्या या मागणी ला विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड यांनी याचा विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं की, बाजीराव पेशव्यांचं जसं मोठ योगदान आहे, तसं महात्मा जोतिबा फुले यांच देखील आहे. पुण्यातून समतेचा विचार पुढे आला तर स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही अशीच मागणी केली आहे. 

(नक्की वाचा-  Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?)

हा सगळा विरोध मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला मिळत असताना आज वंचित भाऊजन आघाडी आणि त्यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, कामगार आघाडी आणि इतर सगळे पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाला निवेदन देणार आहेत. हे निवेदन देत ते अशी मागणी करणार आहेत की पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा जोतिबा फुले यांच नाव देण्यात यावं. 

आतापर्यंत फक्त मिलिंद एकबोटे यांनी या मागणीच समर्थन केल आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना म्हटलं की, “पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात याव अशी मागणी केल्याबद्दल मी खासदार मेधा कुलकर्णींचं अभिनंदन करतो. बाजीराव पेशवे हे पुण्यातील एक योद्धा होते. भारताची उत्तर दिशा त्यांनी पादक्रांत केली होती. बाजीराव पेशव्यांच्या तलवारीमुळे अनेक संस्थानं निर्माण झाली होती. बाजीराव पेशवे हे सामाजिक समतेचं प्रतीक होते.”

(नक्की वाचा-  Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या)

“बाजीराव पेशव्यांचा अभिमान प्रत्येक पुणेकराला वाटला पाहिजे. काही बिनडोक लोक बाजीराव पेशव्यांवर टीका करतात. मेधा कुलकर्णी यांना नावं देखील ठेवण्यात येत आहे हे त्या लोकांच अज्ञान आहे. पुणेकर म्हणून पुण्यात घडलेल्या इतिहासाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. बाजीराव पेशव्यांची गुणवत्ता न पाहता त्यांची जात पाहतात. या लोकांची पेशव्यांवर बोलण्याची लायकी नाही,” असे देखील मिलिंद एकबोटे यांनी म्हटले. 

या सगळ्या मागणी आणि विरोधात तिसरी गोष्ट अशी समोर आली आहे. एक निवृत्त लेफ्टनंट कर्नल जोगळेकर यांचं अस म्हणणं आहे की, १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर पुणे रेल्वे स्थानकाला लेफ्टनंट कमांडर तारापोर यांच देखील नाव देण्यात आल आहे. त्याची कोनशीला आजही पुणे रेल्वे स्थानकाची फलाट क्रमांक एकवर आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com