जाहिरात

Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?

ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांची सायबर फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वसईतील संतोष अच्युत शेंडे या सेवानिवृत्त प्राध्यापकांना WhatsApp व्हिडिओ कॉल करून, आपण पोलीस आणि TRAIचे अधिकारी असल्याचे सांगितले.

Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?

मनोज सातवी, पालघर

Vasai Crime News : वसईतील निवृत्त प्राध्यापकाची WhatsApp व्हिडिओ कॉलद्वारे पोलीस आणि TRAI चे अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 1.35 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. संतोष अच्युत शेंडे असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. 19 मे ते 23 जून 2025 दरम्यान त्यांची फसवणूक झाली.  या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात आयटी अॅक्टसह विविध कलाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही.

( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )

ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांची सायबर फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वसईतील संतोष अच्युत शेंडे या सेवानिवृत्त प्राध्यापकांना WhatsApp व्हिडिओ कॉल करून, आपण पोलीस आणि TRAIचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी संदीप राव, निरज कुमार आणि विजय खन्ना अशी स्वतःची ओळख सांगितली. 

(नक्की वाचा-  Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या)

कशी घडली घटना? 

सायबर भामट्यांनी शेंडे यांना त्यांच्याविरुद्ध TRAI आणि पोलीसांनी गुन्हा नोंदवला असून अटक वारंट जारी केलं असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी तुम्हाला मुंबईतल्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे लागेल. अन्यथा आम्हाला तुमच्या घरी येऊन अटक करावी लागेल असेही सांगितले. शिवाय चौकशीसाठी तुमच्या खात्यात असलेली रक्कम आम्ही देऊ त्या खात्यामध्ये जमा करा चौकशीनंतर ती परत केली जाईल असे सांगितले. 

(नक्की वाचा - Love affair news: Facebook वर प्रेम जडलं, 12 वीच्या मुलासाठी नवऱ्याला सोडलं, प्रकरणाला असं वळण मिळालं की...)

त्यामुळे घाबरलेल्या शेंडे यांनी आपल्या चार बँक खात्यातील 1.35 कोटी सात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर या अधिकाऱ्यांसोबत संपर्क झालाच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेंडे यांनी वसई पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वसई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com