Pune News: 13 दिवसात घटस्फोट, पोटगी ही द्यावी लागली नाही, हे कसं शक्य झालं? ही बातमी नक्की वाचा

हे दोघे ही उच्च शिक्षित आहेत. 2017 पासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. 2020 साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

रेवती हिंगवे 

एका उच्च शिक्षित आणि IT मध्ये काम करणाऱ्या दांपत्याने घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा घटस्फोट अवघ्या 13 दिवसात मंजूर करण्यात आला. घटस्फोट म्हटला की किचकट प्रक्रीया असते. घटस्फोट मंजूर होण्यासाठी अनेक वर्ष जातात. पोटगी वरून मतभेद निर्माण होतात. असं असताना पुण्यातील या दाम्पत्याला अवघ्या 13 दिवसात घटस्फोट मिळाला आहे. शिवाय या प्रकरणात पोटगी ही द्यावी लागलेली नाही. त्यामुळे हे कसं शक्य झालं याची चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यातील एका दाम्पत्याने आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. हे दोघे ही उच्च शिक्षित आहेत. 2017 पासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. 2020 साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर तीन चार महिन्यातच त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. मुलीने सासरी नांदण्यास नकार दिला. ती वेगळी राहू लागली. पाच ते सहा महिने ते वेगळे राहीले. त्या काळात त्या दोघांचा एकमेका बरोबर संपर्क नव्हता. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - RSS शाखेवर दगडफेक प्रकरण; हिंदूंचा अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार, डोंबिवलीतील वातावरण तापले

अशा स्थितीत मुलीने घटस्फोट घेतला पाहीजे अशी नोटीस पतीला पाठवली होती. त्यानंतर दोघांनीही सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी याचिकाही दाखल केली. मात्र घटस्फोटाची याचिका दाखल करताना पती पत्नी एक वर्ष वेगळे राहाणे गरजेचे असते. शिवाय याचिका दाखल केल्यानंतर सहा महिने हा कुलींग कालावधी असतो. या कालावधीत समोपदेशन केले जाते. या काळात दोघांचे मन बदलून ते परत एकत्र राहायला तयार होतात का यासाठी कोर्ट वेळ देते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vidhan Parishad : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी पाचही उमेदवारांची नावं जाहीर

मात्र या प्रकरणात समोपदेशन झाल्यानंतर दोघांनीही कोर्टाला विनंती केली. आम्हाला सहमतीने वेगळे व्हायचे आहे. आमचा निर्णय पक्का आहे. त्यासाठी वेळ वाया घालवायचा नाही. यातून कोर्टाचाही वेळ वाया जाईल. त्यामुळे सहा महिन्याचा कुलींग कालावधी रद्द करण्याची विनंती या दोघांनीही कोर्टाला केली. शिवाय पोटगीवरही महिलेने दावा केला नाही. तिला कोणत्याही स्वरूपाची पोटगी नको होती. ती स्वता चांगली कमवते. तिची आर्थिक स्थितीही चांगली आहे. तिला तिच्या भविष्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे घटस्फोट मंजूर करावा असंही तिने कोर्टात सांगितले होते.      

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Political News : "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल

त्यामुळे कोर्टाने या दोघांचीही ही विनंती मान्य केली. मुलगी स्वतंत्र होती. तीला नवी लाईफ सुरू करायची होती. ती कमवती होती. तिची आर्थिक स्थिती ही चांगली होती. तीला पोटगी नको होती. शिवाय तिला कोर्टात वेळ वाया घालवायचा नव्हता. शिवाय दोघेही उच्च शिक्षित होते. या सर्व गोष्टी पाहाता कोर्टाने सहा महिन्याचा कालावधी काढून टाकला. शिवाय याचिका दाखल केल्याच्या अवघ्या 13 व्या दिवशी या दोघांचाही घटस्फोट मंजूर केला. 

ट्रेंडिंग बातमी - Ahilyanagar News : हात-पाय, शीर कापलं, तरुणाची निर्घृण हत्या; तपासात समोर आलेलं हत्येचं कारण धक्कादायक 

अॅड. विकास कांबळे यांनी या दोघांकडून ही याचिका दाखल केली होती. दोन्ही पक्ष जर सहमतीने घटस्फोट घेणार असतील. त्यांच्यात कोणत्या ही विषयावरून वाद नसेल. तर सहा महिन्याचा कुलींग कालावधी काढला जावू शकतो असं, सर्वोच्च न्यायालयाचा ही निकाल आहे असं कांबळे यांनी सांगितलं. 2024 साली ही अशाच पद्धतीचे जजमेंट आले आहे. त्यामुळे या दोघांचा घटस्फोट जलद आणि विक्रमी वेळेत झाला. दोन्ही पक्षामध्ये जर वाद विवाद नसतील तर कोर्टही त्यांना तातडीने घटस्फोट देण्यास तयार असतं हे यावरून स्पष्ट झालं आहे.