जाहिरात

Vidhan Parishad : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी पाचही उमेदवारांची नावं जाहीर

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी पाचही उमेदवारांची अधिकृत नावं जाहीर करण्यात आली आहे.

Vidhan Parishad : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी पाचही उमेदवारांची नावं जाहीर

Vidhan Parishad Candidate List : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी पाचही उमेदवारांची अधिकृत नावं जाहीर करण्यात आली आहे. काल 16 मार्च रोजी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून नावांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटचा दिवस आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज सोमवारी विधान परिषद पोट निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणुका होणार आहेत. अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या जागेसाठी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आज अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

Political News : "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल

नक्की वाचा - Political News : "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी...

भाजप - 
1. संदीप जोशी
2. संजय केनेकर
3. दादाराव केचे

अजित पवार गट -
4. संजय खोडके 

शिंदे गट - 
5. चंद्रकांत रघुवंशी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: