Pune News: मिसिंग लिंकवर पहिला मोठा अपघात, तिन कार एकमेकांना धडकल्या, अपघाताचं कारण आलं समोर

ज्यामुळे लागोपाठ तीन वाहनांचा चेन-लिंक अपघात झाला. या तिन्ही कार एकमेकांवर आदळल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

मेहबूब जमादार 

मुंबई पुण्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मिसिंग लिंक गेमचेंजर ठरला आहे. आधी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुळे प्रवास सुसाट झाला होता. त्यात मिसिंग लिंकची भर पडल्यानंतर हा प्रवास जवळपास अर्धातासाने कमी झाला आहे. या मिसिंग लिंकवरून जाणे ही एक पर्वणीच ठरत आहे. पण इथून जाताना वेगाची मर्यादा पाळणे ही तितकेच महत्वाचे आहे. मिसिंग लिंकवर वाहने थांबवण्यास मनाई आहे. अपघात होवू नये यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर पहिला अपघात बुधवारी सकाळी इथं झाला. हा विचित्र अपघात होता. यात तिन गाड्या एकमेकांवर आदळल्या. 
  
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथील मिसिंग लिंकवर हा अपघात झाला. पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रिजवर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तिन गाड्यांमध्ये चेन-लिंक टक्कर झाली. समाधानाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याचे ही कारण समोर आले आहे. 

नक्की वाचा - Pune News: मुंबई- पुणे बुलेट ट्रेन! 48 मिनिटांचा सुसाट प्रवास, पुणे हैदराबाद ही जवळ येणार, पुढचा प्लॅन ठरला

Advertisement

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या फॉर्च्युनर कारचे चालक विजय नारायण खाडे यांनी आपल्या गाडीचा अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर त्यांनी आपली गाडी तिसऱ्या लेनमध्ये थांबवली. यामुळे मागून येणाऱ्या एका व्हेर्ना कारने फॉर्च्युनरला मागून जोरदार धडक दिली. व्हेर्नाच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही पुढच्या वाहनाला धडक दिली. ज्यामुळे लागोपाठ तीन वाहनांचा चेन-लिंक अपघात झाला. या तिन्ही कार एकमेकांवर आदळल्या. 

नक्की वाचा - Washim News: '...तर गाडी सकट जिवंत जाळू' खासदार फुटला, शिवसैनिक भडकला! धमकी झाली व्हायरल

या अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस, एम.एस.आर.डी.सी. आणि अफकॉनच्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. नंतर, क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आहेत. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मिसिंग लिंकवरून गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.