Pune News: पुणे तिथे काय उणे! ऐन दिवाळीत नामांकीत पबमध्ये रंगला जुगाराचा डाव, Video viral

विशेष म्हणजे हे सगळं होत असताना पुणे पोलीस काय करत होते असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे 

पुणे तिथे काय उणे असं म्हणतात तेच खरं. पुण्याची खरी ओळख सांस्कृतीक शहर म्हणून आहे. पण आता हीच ओळख पुसली जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. एकीकडे गुन्हागारी पुण्यात डोकं वर काढत आहे. मग ते गँगवॉर असो की कोयता गँगची दहशत असो पुणे हे नेहमी चर्चेत असतं. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनाही पुण्यात काही कमी नाहीत. त्यात वाढ होत आहे पण कमी होण्याचं नाव नाही. आता दिवाळी सुरू आहे. त्यात पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगारावर बंदी असताना ही एका नामांकित पबमध्ये जुगाराचे डाव खेळले जात होते. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
हा नामांकित पब पुण्यातील कोरेगाव आयटी पार्क परिसरात आहे. याच पबमध्ये जुगार खेळला जात होता. पत्त्याचे डाव मांडले गेले होते. पैशांची उधळण होत होती. कसिनोमध्ये जसं चित्र असतं तसचं चित्र या पबमध्ये पाहायला मिळत होते. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल माडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजेय या पबमध्ये जुगार खेळण्यास बंदी आहे. असं  असताना देखील जुगार खेळला जात होता. दिवाळीचा सण आहे. सर्व जण दिवाळी साजरी करत आहेत. पण दुसरीकडे सणाच्या नावाखाली पबमध्ये पोकर खेळला जात होता. 

नक्की वाचा - Pune News:'आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो', तरुणाने इन्स्टावर पोस्ट टाकली, त्यानंतर पोलीसांनी जे केलं ते...

विशेष म्हणजे हे सगळं होत असताना पुणे पोलीस काय करत होते असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  कसिनो प्रमाणे डाव रंगवले जात होते. त्यांना कसलीही भिती नव्हती. या पबमध्ये जुगार खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही झाली होती. या गर्दीचा आणि पबमध्ये खेळल्या जात असलेल्या जुगाराचाच व्हिडीओ बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे पोलीस हे पुणेकरांच्या रडारवर आले आहेत. याबाब पुणे पोलीसांना कसं काही माहित नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - Pune News: 20 मजूरांसह 12 लहान मुलांना ठेवलं नजर कैदेत, वीट भट्टी मालकाचं हे अघोरी कृत्य का केलं?

एकीकडे शनिवारवाड्याचा मुद्दा पुण्यात तापला आहे. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यातून होतानाही दिसत आहे. तेच नेते आता या अशा घटनांना आवर घालण्यासाठी पुढे येणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. या पबमध्ये घुसून त्यावर कारवाईसाठी कुणी सरसावणार आहे का याचीही विचारणा पुणेकर करत आहे. त्यामुळे मुळ समस्या बाजूला राहात आहेत. नको त्या गोष्टींना हात घातला जात आहे अशा प्रतिक्रिया ही पुणेकरांमधून उमटत आहे. त्यात आता पुणे पोलीस या पबवर काय कारवाई करतात  हे पहावं लागणार आहे. 
 

Advertisement