सूरज कसबे
सिया गोयल हीने आपला होणारा पती केतन अग्रवाल याची लोहगडावर नेवून हत्या केली. त्यानंतर लोहगड अचानक प्रकाशात आला. इथं आधी ही पर्यटक जात होते. पण सिया प्रकरणानंतर तिथे जाणाऱ्यांचा ओघ वाढला. पुण्या मुंबई पर्यटक लोणावळा-खंडाळा ऐवजी लोहगडाकडे जात होते. पण आता पाऊस वाढला आहे. सर्वत्र धुक्याची चादर आहे. डोंगर हिरवे गार झाले आहेत. अशा स्थितीत पर्यटकांनी आता आपला मोर्चा दुसऱ्या एका पर्यटन स्थळाकडे वळवला आहे. हे पर्यटनस्थळही लोहगडापासून जवळ आहे.
लोणावळा हे पर्यटकांचे नेहमीच आवडते ठिकाण राहीले आहे. पावसामुळे तर लोणावळ्याचे सौंदर्य आणखी खुलते. त्यामुळे बहुतांश पर्यटक विकेंड लोणावळ्याला नक्की जातात. सध्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्याच्या निसर्गसौंदर्याला पुन्हा एकदा उभारी आली आहे. शनिवार- रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत पर्यटकांनी आपला मोर्चा लोणावळ्याकडे काढला आहे. लोणावळा म्हटलं की भुशी डॅम आपल्या समोर येतं. त्यामुळे याच बुशी डॅमवर सध्या तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
कोसळणारा पाऊस, दाट धुक्याची चादर आणि ओसंडून वाहणाऱ्या भुशी धरणाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येथे दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसर पर्यटकांच्या गजबजाटाने फुलून गेला आहे. तरी उत्साहाच्या भरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. इथं काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आली आहे. पर्यटकांनाही शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान तुम्ही ही सध्याचे लोणावळ्याचे चित्र पाहून प्रेमात पडला. काही महिन्यांपूर्वी लोणावळ्या जवळ असलेल्या लोहगडाकडे पर्यटकांचा ओढा होता. सिया-केतन अग्रवाल प्रकरणानंतर हा किल्ला चर्चेत आला. तिथे पर्यटकांची संख्या वाढली. तिथला एक पॉईंट तर सिया पॉईंट म्हणून बोलले जावू लागले. पण आता पर्यटकांनी तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला आपली पसंती दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात पाहायला मिळत आहेत.