Pune News: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना मोठी भेट, वाहतुकीच्या कटकटीतून होणार सुटका

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. राजाराम पूल ते फनटाइमपर्यंतचा हा उड्डाणपूल शहरातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पुण्यातील बहुप्रतीक्षत अशा सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपूल आजपासून पुणेकरांसाठी खुला झाला आहे. सिंहगड उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळणार आहे. सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. राजाराम पूल ते फनटाइमपर्यंतचा हा उड्डाणपूल शहरातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल असणार आहे. फनटाइम ते विठ्ठलवाडी आणि राजाराम पूल ते फनटाइम असा दोन्ही बाजूला हा उड्डाणपूल आहे.

(नक्की वाचा-  Pune Crime : नामांकित मेडिकल महाविद्यालयात 4 कनिष्ठांचं रॅगिंग, 3 वरिष्ठ डॉक्टरांचं निलंबन)

वाहतुकीचा वेळ वाचणार

अजित पवार यांनी पुलाच्या उद्घाटननंतर म्हटलं की, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झालं आहे. ज्यांनी ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्या सर्वांचे अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा प्रवासाचा अर्धा तास कमी होणार आहे. शहरात 2 रिंग रोड करत आहोत.

पुणे महापालका, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, राज्य सरकार आम्ही ही कामं पूर्णत्वाला नेण्याचे काम करत आहे. आम्ही सगळे जणं मिळून 5 वर्षात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

Advertisement

Topics mentioned in this article