Pune News: एमबीए विद्यार्थ्यांची AI च्या मदतीने घरातच 'गांजा'ची शेती; कच्चा माल खरेदीसाठीही हायटेक आयडिया

Pune News: सुमित देदवाल आणि अक्षय मेहर हे दोघेही एमबीए पदवीधर असून मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि हिंजवडीत राहतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने भाड्याच्या फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या दोन एमबीए पदवीधरांसह चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडीतील या भाड्याच्या फ्लॅटमधून उच्च दर्जाचा ‘OG-कुश' प्रकारचा हायड्रोपोनिक गांजा तयार करून शहरभर पुरवठा करणारे हे जाळे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

AI च्या मदतीने गुप्त शेती

सुमित देदवाल आणि अक्षय मेहर हे दोघेही एमबीए पदवीधर असून मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि हिंजवडीत राहतात. त्यांनी पूर्ण एअर-कंडिशन्ड फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करणारी अत्याधुनिक यंत्रणा उभी केली आणि उत्पादन युनिटचे डिझाईन व संचालन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांचा वापर केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

डार्क वेबवरून मिळवला कच्चा माल

तपासात उघड झाले की आरोपींनी कच्चा माल मिळवण्यासाठी डार्क वेब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. तसेच व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सीचा आधार घेतला. फ्लॅटमधून OG-कुशसह उपकरणे, रोपे इत्यादी मिळून सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या जाळ्याशी संबंधित विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा शहरभर पुरवठा केला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल)

आरोपींच्या चौकशीतून मुंबईतील दोन पुरवठादार मालय राजेश देलिवाला आणि स्वराज भोसले यांची नावे समोर आली आणि पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. देलिवालाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात हायड्रोपोनिक गांजा, साधा गांजा, हॅश, CBD तेल आणि इतर बंदीस्त पदार्थ मिळून 2.8 कोटी रुपयांचा साठा मिळाला. हा माल थायलंडस्थित पुरवठादाराकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखा दर्शवून मागवला जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

Advertisement

Topics mentioned in this article