Pune Heatwave : राज्यभरात उष्णतेची लाट आहे. दिवसभर घामाच्या धारा रात्रीही तापमानाचा पारा चढाच असल्याचं दिसत आहे. हवामान विभागाकडून राज्यात उष्णतेची लाट जाहीर केली असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात 45 अंशावर गेल्याची नोंद तर पुण्याचे तापमान 41 अंशावर असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे शहराचा पारा चढला, शहर झालं 'हॉट'
गेल्या तीन दिवसांपासून पुणेकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस डिग्रीच्यावर पोहोचला आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शिवाजीनगरमध्ये पारा ४१.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सोमवारचे पुणे शहर आणि जिल्ह्यातील तापमान
लोहगाव ४३.८
शिवाजीनगर ४१.४
चिंचवड ४०.७
मगरपट्टा ४०.८
एनडीए ३९
हडपसर ४०.१
दौंड ४०.६
हवेली ४०.५
राजगुरूनगर ४०.५
माळीण ३८.१