Pune News: महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन; भाजप नेत्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Pune Crime News : प्रमोद कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. चहा पीत असताना संबंधित महिला अधिकाऱ्याला चुकून धक्का लागला असल्याची कबुली प्रमोद कोंढरे यांनी दिली. 

जाहिरात
Read Time: 1 min

Pune News : महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रमोद कोंढरे हे भाजप आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहेत.

(नक्की वाचा-  Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या भेटीदरम्यान ही घटना घडली. जिथे संबंधित महिला पोलीस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होती. यावेळी प्रमोद कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्यासोबत कर्तव्यावर असताना गैरवर्तन केले. सीसीटीव्हीमध्ये देखील ही घटना कैद झाली आहे. 

Advertisement

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुराव्याचा भाग म्हणून फुटेजची तपासणी केली जात आहे.

(नक्की वाचा-  Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?)

प्रमोद कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. चहा पीत असताना संबंधित महिला अधिकाऱ्याला चुकून धक्का लागला असल्याची कबुली प्रमोद कोंढरे यांनी दिली.

Topics mentioned in this article