Pune News: कुणाचा पती, कुणाचा भाऊ, तर कुणाचे वडील! 48 तासानंतर ही ते ढिगाऱ्याखालीच, कुटुंबीयांचा टाहो

आम्ही किती वेळ दम धरायचा अशी विचारणा ही त्यांनी केली आहे. इथं काय सुरू आहे याची आम्हाला काहीच माहिती दिली जात नाही असा आरोप होतोय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

मोशी येथील कचरा डेपो इथं इमारत कोसळली होती. या इमरातीच्या ढिगाऱ्यात पंधरा पेक्षा जास्त लोक अडकले होते. त्यातील सह जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. पण या दुर्घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतर ही अजून ही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले नाही. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत घटनास्थळी अडकलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी गर्दी केली आहे. त्यांचा आक्रोश तिथे पाहायला मिळत आहे. बचाव कार्यासाठी लावण्यात आलेली यंत्रणा ही अपूरी असल्याचा आरोप कुटुंबीयांना यावेळी केला आहे. 

48 तासानंतर ही कुणाच्या वडीलांचा, तर कुणाच्या पतीचा तर कुणाच्या भावाच पत्ता लागला नाही. ते कामावर गेले होते त्याच वेळी ही इमारत कोसळली आणि ते ढिगाऱ्या खाली दबले गेले. त्याचा अजून काहीच पत्ता नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा बांध फुटला आहे. तिथे असलेले कुटुंबीय सांगत आहेत की आमच्या घरातल्यांचा  काहीच शोध लागला नाही. इथं कशातच काही नाही. गरीबांसोबत असं करतात का? इथं जर कुणी व्हीआयपी असता तर त्याला कधीच बाहेर काढला असता. सर्व यंत्रणा कामाला लागली असती असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Trending News: ही डॉक्टर तर वाघीण निघाली! थेट पिंजऱ्यात घुसून नरभक्षी वाघीणीला केलं जेरबंद, पिंजऱ्यातला थरार

आम्ही किती वेळ दम धरायचा अशी विचारणा ही त्यांनी केली आहे. इथं काय सुरू आहे याची आम्हाला काहीच माहिती दिली जात नाही. कुणी आम्हाला काही सांगायला तयार नाही. इथं बचाव कार्यासाठी लावलेली यंत्रणा ही अपूर्ण आहे. आता तर पाऊस ही थांबला आहे. त्यामुळे मदत कार्य जोरात होणं गरजेचं आहे.  एका महिलेचा पती या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. तिने ही इथं ठिय्या दिला आहे. ते शिफ्ट येत होते. त्याच वेळी त्यांच्या अंगावर ढिगारा कोसळला असं त्यांनी सांगितलं. ते अजून ही बाहेर आले नाही. त्यांना लवकर बाहेर काढा अशी आर्त हाक त्यांनी दिली. 

नक्की वाचा - Moshi Incident: 'सगळा अंधार झाला अन् आम्ही अडकलो', 6 तास समोर साक्षात मृत्यू; मोशी दुर्घटनेचा थरारक अनुभव

पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये अजूनही आठ कामगार इमारतीच्या मलब्याखाली अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी यंत्रणा अतिशय अपुरी असल्याचा आरोप कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय ते संताप व्यक्त करत आहे. त्यांनी मदतीसाठी अक्षरशः याचना करत टाहो फोडला आहे. रात्री बचाव कार्य थांबविण्यात आलं होतं त्यावेळी तर या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ते चिंतेत होते. अशा संथ गतीने काम सुरू राहिले तर आमचे माणसं कधी बाहेर येणार असा सवाल या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.