Pune News: मुळा-मुठा नद्यांना पूर, संभाजी भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, अविनाश पवार, पुणे

Pune News : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच मागील दोन-तीन दिवसांपासून सुरुच आहे. पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला धरणातून २८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातील मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. याचा परिणाम म्हणून पुणे शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा संभाजी भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.

वाहतुकीवर परिणाम

नदीपात्राला लागून असणाऱ्या रस्त्यांवरही पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक भागांतील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांना कामावर जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणेकरांना दैनंदिन व्यवहार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

(नक्की  वाचा-  Pune Couple Video : धावत्या बाईकवर पुण्यातील जोडप्याचा रोमान्स, दुचाकीवरच्या टाकीवरील महिलेनं जे केलं.... पाहा Video)

पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

Pune News

प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: मीटिंग सुरु होती, तितक्यात मराठी IT इंजिनिअर बाहेर पडला... सातव्या मजल्यावरुन मारली उडी!)

हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांमध्येही पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व तयारी केली आहे. मदत व बचाव पथके पूर्णपणे तयार ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून कोणत्याही क्षणी आवश्यक मदत पोहोचवता येईल. पुणेकरांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article