Pune News: आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट! आरोपी बंडू आंदेकरने कोर्टात जे सांगितलं त्याने संभ्रम वाढला

दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्यानंतर अटक केलेल्या 6 आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

रेवती हिंगवे 

आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा टोळी युद्धाने डोकं वर काढल्याच चित्र आहे.  2024 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली त्यावेळीही अशीच स्थिती होती. ही हत्या त्यांच्याच बहिणीकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकरच्या अजून एका बहिणीच्या मुलाला म्हणजेच गोविंद उर्फ आयुष कोमकरची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही हत्या तेव्हाच करण्यात आली जेव्हा वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष झालं होतं. 5 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास नाना पेठेत जेव्हा आयुष कोमकर क्लास करून परत आला होता तेव्हा त्याच्या लहान भावासमोर तब्बल 9 गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या बंडू आंदेकर यांनी केल्याचा संशय आहे. मात्र याच बंडूच्या कोर्टातील जबाबामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.  

गणपती विसर्जनाच्या पूर्व संध्येला ही अशी घटना घडल्यामुळे पुणे शहरात एक खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या बाबतचा सखोल तपास करण्यासाठी एकूण 5 पथक तैनात केली होती. एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या ८ आरोपी अटकेत आहेत. यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगु, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, आणि वृंदावनी वाडेकर असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी पैकी अमन पठाण, सुजल मेरगु, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्यांनी पुणे न्यायालयात हजर करण्यात आल होतं. 

नक्की वाचा - Pune Gangwar Inside story: आयुष कोमकरची हत्या टाळता आली असती, टीप मिळूनही पोलिसांचं काय चुकलं?

सुनावणी दरम्यान, आयुष कोमकर हत्येतला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने न्यायालयात एक दावा करत खळबळ उडवून दिली. या सगळ्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्याने केला. शिवाय ते केरळ मध्ये होते. अशा स्थितीत या हत्येशी किंवा या हत्येच्या कटाशी आपला काय संबंध असा प्रश्न कोर्टात त्याने उपस्थित केला होता. तर दुसरीकडे युक्तिवाद करताना सरकारी वकील यांचे म्हणणे होते की, “एकूण 16 मुद्दे आहेत. त्या मध्ये हत्येत वापरलेल शस्त्र, ते कुठून आलं, गुन्हा करतानाचे कपडे, फरार असलेले 5 आरोपी, आणि इतर बाबींची चौकशी आणि तपास करायचा आहे. असं सरकारी वकिलांनी सांगितलं.  

त्यावर आरोपी बंडू आंदेकरच्या वकिलाचे म्हणणे होते की, “गेल्या 10 ते 12 तासांपासून हे सर्व जण अटकेत आहेत. जी FIR दाखल केली आहे ती चुकीची आहे. मी माझा नातवाला का मारेन? माझा वैर त्याच्याशी नाही. मला मारायचं असत तर मी माझा प्रतिस्पर्धकाला मारेन. तर जेव्हा माझा मुलाला मारला होता, तेव्हा मी माझा फिर्यादीत माझा मुलीचं नाव घेतलं म्हणून तिच्या सासरकडच्याने माझं नाव या प्रकरणात घेतलं. आहे आरोपीच्या वकीलाने कोर्टात सांगितलं.  

Advertisement

नक्की वाचा - Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्यानंतर अटक केलेल्या 6 आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, आणि शिवराज आंदेकर या 5 फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना कधी यश येते हे पाहण महत्वाचं असणार आहे. तर पुढील तपास अजून काय बाबी समोर येतात याकडे ही सर्वांचे लक्ष आहे. हा कट कसा आणि कधी रचण्यात आला, अजून कोण या हत्येशी संबंधित आहे या सगळ्याची उत्तर देखील अपेक्षित आहेत.