Pune News: पिंपरीत हायव्होल्टेज ड्रामा! महापौरांच्या डायससमोर राष्ट्रवादीचा राडा, भाजप बॅकफूटवर

स्वतःच्या पक्षातील नावे निश्चित नसल्याने भाजप संपूर्ण विषय वारंवार पुढे ढकलत असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सुरज कसबे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीचा विषय सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा तहकूब केल्याने सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेवकांनी थेट महापौरांच्या डायससमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे हा निर्णय लांबणीवर पडत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सभागृह डोक्यावर घेतले.

महापालिकेत एकूण 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये पक्षीय बलाबलानुसार भाजपचे 7 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील नावे निश्चित करून त्यांचे अर्जही सादर केले आहेत. मात्र, भाजमध्ये 7 जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. स्वतःच्या पक्षातील नावे निश्चित नसल्याने भाजप संपूर्ण विषय वारंवार पुढे ढकलत असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Beed News: वय वर्ष 19, लग्न झाली 8, देखण्या तरुणीचं 9 वं लग्न, पण पुढे जे घडलं त्याने नवरदेव ढगात

सभेत नगरसेवक विनोद नढे यांनी विषयाचे वाचन करताच, हा विषय तहकूब करण्यात येत असल्याचे समोर आले. यावर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक झाले. "पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची नियुक्ती झाली आहे, मग इथेच अडवणूक का? आमची नावे वैध असताना भाजपमधील वादासाठी आम्हाला का ताटकळत ठेवता?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, एखाद्याचे नाव बदलण्यासाठी सत्ताधारी दबाव टाकू शकत नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

नक्की वाचा - D Mart Secret: डी-मार्टमध्ये शॉपिंग करताय? 'या' टिप्स फॉलो करा, 5 हजारांचे बिल होईल 2 हजार

गोंधळ वाढल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना महापौरांनी भाजपमध्ये एका नावावरून अद्याप एकमत झाले नसल्याची कबुली दिली. "बाकी सर्व नावे अंतिम झाली आहेत, फक्त एका नावाचा निर्णय बाकी आहे. पुढील बैठकीत हा विषय नक्की मंजूर करू," असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, या सर्व प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता सार्वजनिक रित्या समोर आली आहे.