जाहिरात

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास होणार स्वस्त आणि मस्त; 'भारत टॅक्सी'मुळे बदलणार चित्र, पाहा दर

Bharat Taxi in Pune: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतातील पहिली सहकार-आधारित आणि चालकांच्या मालकीची 'भारत टॅक्सी' कॅब सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृतपणे सुरू झाली आहे.

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास होणार स्वस्त आणि मस्त; 'भारत टॅक्सी'मुळे बदलणार चित्र, पाहा दर

ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) च्या मनमानी आणि अचानक वाढणाऱ्या भाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. देशातील पहिली सहकारी तत्वावर आणि चालकांच्या मालकीची 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. पावसाळ्यात किंवा गर्दीच्या वेळी भाड्यात अवाढव्य वाढ न करता, ग्राहकांना रास्त आणि निश्चित दरात सेवा देण्याचा दावा या टॅक्सी सेवेने केला आहे.

'झिरो कमिशन' अन् 35 हजार चालकांचा सहभाग

मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी ही सेवा ॲपवर उपलब्ध झाली आहे. इतर कंपन्यांप्रमाणे चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. त्यामुळे चालकांचे उत्पन्न वाढणार आहे.

भारत टॅक्सीवर आतापर्यंत तब्बल 35000 चालकांनी नावनोंदणी केली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (RTO) नियमांनुसार आणि चालकांशी चर्चा करूनच भाडे निश्चित करण्यात आले आहे.

सर्ज प्राईसिंग नाही; फक्त पीक अवर्समध्ये 10% वाढ

इतर कॅब ॲप्सवर मुसळधार पाऊस, सण-उत्सव किंवा गर्दीच्या वेळी भाडे दुप्पट-तिप्पट होते. मात्र, भारत टॅक्सीमध्ये दिवसभर भाडे स्थिर राहील. फक्त सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत मूळ भाड्यावर 10 टक्के वाढ असेल. 

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)

पुण्यासाठी भारत टॅक्सीचे दरपत्रक 

  • ऑटो-रिक्षा: 18 रुपये प्रति किलोमीटर
  • मोटारसायकल (राइड विथ पिलियन):  24 रुपये प्रति किलोमीटर
  • सेडान कॅब : 25 रुपये प्रति किलोमीटर
  • एसयूव्ही : 32 रुपये प्रति किलोमीटर

पुणे ते मुंबई आंतरशहरी सेवा आणि विमानतळ पिकअप

भारत टॅक्सीने पुणे ते मुंबई आंतरशहरी सेवेचे दरही जाहीर केले आहेत. हॅचबॅकसाठी 21 रुपये प्रति किमी, सेडानसाठी 23 रुपये प्रति किमी आणि एसयूव्हीसाठी 30 रुपये प्रति किमी असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बूथ सुरू करण्याबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चा सुरू असून, ही सेवाही लवकरच सुरू होणार आहे.

पुणे-मुंबईनंतर आता नाशिक, सोलापूर, कोल्हापूरसाठीही टॅक्सी सेवा

येत्या काळात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर या प्रमुख मार्गांवरही ही आंतरशहरी सेवा वाढवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खाजगी कॅब कंपन्या रात्रीच्या वेळी प्रवाशांकडून अवाढव्य दर आकारतात. मात्र, भारत टॅक्सीच्या या निश्चित भाड्याच्या मॉडेलमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी बचत होणार आहे. सध्याच्या ॲप-आधारित चालकांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याच्या वाढत्या तक्रारी या सेवेमुळे दूर होतील आणि प्रवाशांना एक अत्यंत सुरक्षित आणि परवडणारा प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com