Ajit Pawar: अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी परवानगीशिवाय घडली गंभीर घटना, जर संशयास्पद आढळलं तर...

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अतिशय गंभीर घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar News: अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गंभीर घटना"
PTI

Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी (29 जानेवारी 2026) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा अंत्यसंस्कार विधी पार पडला. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (VVIP) ये-जा सुरू असताना परवानगीशिवाय उडवण्यात येत असलेले चार ड्रोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

बारामती विमानतळाजवळ बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मैदानात शासकीय इतमामात पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "VVIP लोकांची ये-जा सुरू असताना विद्या प्रतिष्ठान मैदान परिसरात पोलिसांना किमान चार ड्रोन अनधिकृतपणे उडताना आढळले. सुरुवातीला ड्रोन चालकांना ड्रोन वापरणे थांबवण्याची घोषणा करण्यात आली, पण कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने पोलीस पथकाने ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व ड्रोन खाली पाडले."

(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवार विमान प्रवासात प्रचंड घाबरले होते, देवाच्या नावाचा करू लागले होते जप, पाहा VIDEO)

Advertisement

या ड्रोनचा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वापर कोणत्या उद्देशाने केला जात होता, याची चौकशी सुरू असून ड्रोन चालकांची विचारपूस करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,"जर काहीही संशयास्पद आढळले, तर उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल.”

(नक्की वाचा: Ajit Pawar: 'अजित दादा अमर रहे', 'अजित दादा परत या' म्हणत अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा)

Advertisement

पोलिसांनी सांगितले की, अंत्यसंस्काराला अजित पवार यांचे दोन लाखांहून अधिक समर्थक तसेच देशाच्या विविध भागांतून आलेले अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच विविध प्रमुख राजकीय नेते आणि इतर मान्यवरांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 

Advertisement