एका नामांकीत रुग्णालयाने फक्त पैशासाठी एका गर्भवती तरुणीच्या जीवाशी खेळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. तिला वेळीच उपचार मिळाले नाही. हॉस्पिटलच्या गेटवरूनच पैशासाठी परत पाठवले गेले. ऐन वेळी अॅम्ब्युलन्सही मिळाली नाही. प्रसूती वेदना होत होत्या. अशा वेळी खाजगी गाडीने 25 किलोमिटर लांब रुग्णालयात त्या विवाहीत तरुणीला नेण्यात आलं. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. पण योग्य उपचार तिथे न मिळाल्यामुळे तिची तब्बेत खालावली. तिला परत दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. पण त्या रुग्णालयात नेल्यावर तिथेच तिचा मृत्यू झाला. जर तिला वेळीच उपचार मिळाले असते तर त्या तरुणीचे जीव वाचले असते. दोन नवजात लेकींवर आई गमावण्याची वेळ आली नसती. हे प्रकरण पुढे आल्यानंतर पुण्यात त्या रुग्णालया विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुशांत भिसे हे यांची पत्नी तनिषा भिसे यांनी प्रसूती वेदना होत होत्या. सुशातं भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक आहेत. प्रसूती वेदना होत असल्याने सुशांत यांनी आपल्या पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालया नेलं होतं. पण त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो उपचार सुरू करा अशी विनंती सुशांत यांनी केली. त्याच वेळी काही मंत्री आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. पण रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. प्रसूती वेदना वाढत चालल्या होत्या. शिवाय त्यांची तब्बेतही खालावत होती. त्यामुळे शेवटी नाईलाजाने सुशांत यांनी वाकड इथल्या सुर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला.
ट्रेंडिंग बातमी - Mhada News: म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला
दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या गेटवरूनच ते वाकडसाठी निघाले. हे रुग्णालय मंगेशकर हॉस्पिटलपासून जवळपास 25 किमी अंतरावर होते. त्यावेळी त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सही उपल्बध झाली नाही. शेवटी खाजगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिझेरीन द्वारे प्रसुती करण्यात आली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला होता. पण त्यांची तब्बेत मात्र ढासळली होती. त्यांना योग्य उपचार मिळाले नव्हते. अशी वेळी सुर्या हॉस्पिटल मधून त्यांना हलवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तनिषा यांना जवळच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. योग्य उपचार वेळीच न मिळाल्या मुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय हादरून गेले.
एकीकडे दोन दोन लेकींच्या जन्माचा आनंद असताना दुसरीकडे त्यांची आई मात्र त्यांना काही मिनिटांनीच त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे दुखा:चा डोंगर परिवारावर कोसळला होता. दिनानाथ रुग्णालयाने पैशा पेक्षा माणूसकी जपली असती तर दोन लहान लेकी आज आई पासून वंचित राहील्या नसत्या. तनिषा भिसे यांचा जीव वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने माणूसकी ऐवजी पैशाला जास्त महत्व दिलं. त्यामुळे एका तरुणी आईचा जीव गेला. यामुळे पुण्यात या नामांकित रुग्णालयाबाबत चिड आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहेत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. सध्या मला जास्त बोलता येणार नाही, असं रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी स्पष्ट केले आहे.