जाहिरात

IKEA Pune Viral News: नाद खुळा! IKEAने मराठी अस्मिता जपली, स्टोअरमधील पुणेरी पाट्यांचा सोशल मीडियावर धुरळा

Pune News: पुण्यातील IKEA स्टोअरमधील पुणेरी पाट्या सोशल मीडियावर व्हायरल, पुणेकरांचे लक्ष वेधले; पाहा व्हायरल फोटो...

IKEA Pune Viral News: नाद खुळा! IKEAने मराठी अस्मिता जपली, स्टोअरमधील पुणेरी पाट्यांचा सोशल मीडियावर धुरळा
"IKEA Puneri Patya Viral News: पुण्यातील IKEA स्टोअरमधील पुणेरी पाट्या व्हायरल"
IKEA Instagram

Pune News: 'पुणे तिथे काय उणे' असं उगाचच म्हटलं जात नाही. पुण्याची संस्कृती, इथली मिसळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या 'पुणेरी पाट्या' जगप्रसिद्ध आहेत. आता याच पुणेरी पाट्यांचा मराठमोळा स्वॅग स्वीडिश फर्निचर कंपनी 'IKEA'च्या स्टोअरमध्ये पाहायला मिळत आहे. पुण्याच्या मार्केटमध्ये पाय रोवण्यासाठी IKEAने थेट पुणेकरांच्या मनाला साद घातली आहे.

नेमका प्रकार काय? | Pune IKEA Store Photos Viral

नुकत्याच पुण्यात दाखल झालेल्या IKEA स्टोअरमध्ये ग्राहकांचे स्वागत साध्या फलकांनी नाही, तर अस्सल पुणेरी टोमणे असलेल्या पाट्यांनी होत आहे. ट्रॅफिकपासून ते दुपारी घेतल्या जाणाऱ्या वामकुक्षीपर्यंतच्या विषयांवर या पाट्यांमध्ये मिश्किल टिप्पणी करण्यात आली आहे.

सर्वात जास्त चर्चा रंगतेय ती म्हणजे झोपण्याच्या वेळेची. "आमच्याकडे दुपारी 1 ते 4 झोपण्यासाठी पलंग आहेत, उशिरा उठलात तर आम्ही जबाबदार नाही" अशा पाट्या पाहून पुणेकरही खळखळून हसत आहेत. इतकेच नाही तर "Z ब्रिजवर बसून फ्युचर प्लॅन करण्यापेक्षा IKEA मध्ये येऊन फ्युचर होम सजवा" असा सल्लाही या स्टोअरने दिला आहे.

सहसा आंतरराष्ट्रीय ब्रँड्समध्ये इंग्रजीचा वापर अधिक असतो, पण IKEA ने स्थानिक पुणेकरांची नस ओळखून स्टोअरमध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिले आहे. मराठी शब्दांचा वापर केल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे अधिक सोपे आणि आपलेसे वाटत आहे.

(नक्की वाचा: Pune News: सावधान! पुणेकरांनो तुमची गाडी जुनी आहे? नवे नियम वाचा नाहीतर बसेल भुर्दंड; वाहतुकीत होणार मोठे बदल)

IKEAमधील पुणेरी पाट्या सोशल मीडियावर व्हायरल | IKEA Puneri Patya 

या पाट्यांचे फोटो सध्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तुफान व्हायरल होत आहेत. एका पाटीवर लिहिले आहे, "हे प्रवेशद्वार आहे, चपलांचे पार्किंग नाही", तर दुसरीकडे "खुर्ची बसायला, कपड्यांसाठी नाही" ही पाटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी IKEA ने वापरलेली ही जाहिरातबाजीची पद्धत सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. जागतिक ब्रँड्स जेव्हा स्थानिक भाषेचा आणि विनोदाचा आधार घेतात, तेव्हा ते ग्राहकांच्या किती जवळ जाऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही अजून या पाट्या पाहिल्या नसतील, तर लवकरच चक्कर टाका. 

IKEAमधील पुणेरी पाट्या | IKEA Puneri Patya Photos

  1. ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आमच्या IKEA स्टोरमध्ये हरवलेले बरे, इथे किमान बसायला सोफा तरी मिळेल!
  2. खुर्ची बसायला, कपड्यांसाठी नाही.
  3. हे प्रवेशद्वार आहे, चपलांचं पार्किंग नाही.
  4. Z ब्रिजवर बसून फ्युचर प्लॅन करण्यापेक्षा IKEA मध्ये येऊन फ्युचर होम सजवायला घ्या.
  5. पुणे तिथे काय उणे? मिसळ, मस्तानी आणि MALM पण आहे.
  6. आमच्याकडे दुपारी 1 ते 4 झोपण्यासाठी पलंग आहेत. उशिरा उठलात तर आम्ही जबाबर नाही
  7. ओटा स्वयंपाकासाठी, वस्तू साठवण्यासाठी नाही.
  8. फक्त बघायला येणाऱ्यांनी भुकेले पोट आणि रिकामे हात भरले, तरी हरकत नाही.

(नक्की वाचा: How To Recycle Old Clothes: जुन्या कपड्यांचे मिळतील हजारो रुपये, रक्कम देण्यासाठी माणूस येईल थेट तुमच्या घरी; भारतात 3 पोर्टल सुरू)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com