- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात सुमारे 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवी दरवाढ 1 एप्रिल 2026पासून लागू झाली आहे.
नेमकी दरवाढ किती? | Pune Satara Khed Shivapur Toll Price Hike
पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सरासरी 3 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. कार, जीप यासारख्या हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रक आणि मल्टी-ॲक्सल वाहनांच्या दरातही वाढ झाली आहे.
(नक्की वाचा: LPG Cylinder: घरगुती गॅसच्या डिलिव्हरीला का लागतोय उशीर? आता किती दिवसांत घरी पोहोचणार सिलिंडर? वाचा नियम)
रोख व्यवहार पूर्णपणे बंद
यावेळच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे व्यवहारांची पद्धत. आजपासून टोल नाक्यावर रोख रक्कम (Cash) स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सर्व व्यवहार आता केवळ 'फास्टॅग' (FASTag) किंवा डिजिटल माध्यमातूनच होतील. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल किंवा ज्यांच्या फास्टॅगमध्ये पुरेशी शिल्लक नसेल, त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
(नक्की वाचा: Income Tax Rules Changes: 1 एप्रिलपासून एकच टॅक्स ईअर! ITRची डेडलाइन, HRAसह काय-काय बदलणार? वाचा सविस्तर)
स्थानिक नागरिकांना आवाहनटोल प्रशासनाने स्थानिक नागरिकांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी तरतूद कायम ठेवली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीच्या दरातील मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमित भाटिया यांनी केले आहे. यामुळे स्थानिक वाहनचालकांना दररोजच्या प्रवासात मोठी सवलत मिळू शकणार आहे.

Photo Credit: NDTV Marathi
प्रवाशांवर काय होणार परिणाम?पुणे आणि सातारा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर रोज हजारो वाहनांची ये-जा असते. या दरवाढीमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि वाहतूकदारांच्या खिशावर भार पडणार आहे.दरम्यान प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम असल्याची खात्री करावी, जेणेकरून टोल नाक्यावर खोळंबा होणार नाही.
बंगळुरू–पुणे (NH-48) खेड शिवापूर टोल प्लाझा
खेड शिवापूर टोल (पुणे–बंगळुरू महामार्ग)
नवीन / सध्याचे दर (1 एप्रिल 26 पासून लागू) (NHAI च्या माहितीनुसार)वाहन प्रकार आणि दराची माहिती
- कार / जीप / व्हॅन - एकमार्ग 125 रुपये, परतीचा प्रवास 185 रुपये
- LCV - एकमार्ग 200 रुपये, परतीचा प्रवास 295 रुपये
- बस / ट्रक - एकमार्ग 415 रुपये, परतीचा प्रवास 620 रुपये
- 3 अॅक्सल - एकमार्ग ₹650 रुपये,परतीचा प्रवास 975 रुपये
- 4–6 अॅक्सल - एकमार्ग ₹650 रुपये,परतीचा प्रवास 975 रुपये
- 7+ अॅक्सल - एकमार्ग 790 रुपये,परतीचा प्रवास 1190 रुपये
जुने दर (वर्ष 2024)
कार: 115 रुपये → 120 रुपये (दरवाढीनंतर)
LCV: 185 रुपये → 190 रुपये
बस/ट्रक:390 रुपये → 400 रुपये
जड वाहने: 415 रुपये → 420 रुपये
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग (Mumbai–Pune Expressway) टोल दर
नवीन टोल दर
वाहन प्रकार एकमार्ग - टोल
कार / जीप / SUV - 320 रुपये
LCV / मिनीबस - 495 रुपये
2-अॅक्सल ट्रक - 685 रुपये
बस - 940 रुपये
मल्टी-अॅक्सल - 1630 रुपये– 2165 रुपये
हे दर सध्या लागू असून प्रवासासाठी मुख्यतः खालापूर आणि तळेगाव टोल समाविष्ट असतात
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world