अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : पुणे-नगर महामार्गावरील शिरुर तालुक्यात रांजणगावचा श्री महागणपती अष्टविनायकांपैकी आठवा अत्यंत शक्तिशाली गणपती मानला जातो. येथील गणेशाची मूर्ती १० सोडेंची आणि २० हातांची आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त अष्टविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. दरम्यान पुढील साते तीन महिने मंदिर बंद असणाप आहे. ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रांजनगावचं श्री महागणपती मंदिर बंद ठेवण्याचं कारण?
रांजणगाव गणपती मंदिर विकास कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती आहे. या काळात मंदिराची दुरुस्ती आणि परिसर व्यवस्थापन करण्यात येणार आहे. महागणपती मंदिरातील ओवऱ्या, गाभारा, मंदिरासभेवतीची दगडी फरसबंदी, नगराखान्याचं काम या कामांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. मंदिर सुरू ठेवून ही कामं करणं कठीण आहे.
अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर हे विकास कामांसाठी 15 एप्रिल पासून 31 जुलै पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय आज झालेल्या ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत अष्टविनायक महागणपती रांजणगाव देवस्थानचा ही विकास होणार असल्याने पुढील काही दिवस मंदिर बंद राहणार असल्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत पार पडला आहे.