- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बोपदेव घाट परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका सध्या धगधगत आहे. भिवरी गावात बोपदेव घाटात येऊन दहशत पसरवणाऱ्या कोंढव्यातील टोळ्यांवर कडक कारवाई करावी आणि पुरंदरमध्ये फोफावणाऱ्या तथाकथित लँड जिहादला लगाम लावावा, या प्रमुख मागण्यांसाठी 'सकल हिंदू समाज, पुरंदर'च्या वतीने भव्य आज 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
बोपदेव घाटातील दहशतीचा मुद्दा
गेल्या काही दिवसांपासून भिवरी गाव आणि बोपदेव घाट परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या मुस्लीम टोळक्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे स्वसंरक्षणासाठी पुढे आलेल्या भिवरीतील स्थानिक ग्रामस्थांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते मागे घेण्याची आक्रमक मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.
विमानतळ क्षेत्रात 'लँड जिहाद'चा आरोप
पुरंदर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जमिनींना सोन्याचे मोल आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील विविध गावांमध्ये मुस्लीम समाजाकडून मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केली जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे.
(नक्की वाचा: Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! आज सासवड रस्ता पूर्णपणे बंद;घराबाहेर पडण्यापूर्वी हे पर्यायी मार्ग नक्की पाहा)
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि मार्गया विराट मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. हा मोर्चा सासवडमधील शिवतीर्थावरून सुरू होऊन भिवरी, बोपदेव घाट मार्गे कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत काढण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
मोर्चाची व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेता, प्रशासनाकडून सासवड ते कोंढवा या संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.