जाहिरात

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! आज सासवड रस्ता पूर्णपणे बंद;घराबाहेर पडण्यापूर्वी हे पर्यायी मार्ग नक्की पाहा

Pune News: पुण्यातील खडी मशीन चौक ते सासवड रस्ता आज (8 एप्रिल) हिंदू जनआक्रोश मोर्चामुळे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. बापदेव घाट आणि भिवरी प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत असून, प्रवाशांसाठी दिवेघाट मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! आज सासवड रस्ता पूर्णपणे बंद;घराबाहेर पडण्यापूर्वी हे पर्यायी मार्ग नक्की पाहा
"Pune News: पुण्यातील सासवड रस्ता आज बंद, कारण..."
NDTV Marathi And Canva

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: पुरंदर तालुक्यातील भिवरी आणि बापदेव घाट परिसरात घडलेल्या काही घटनांच्या निषेधार्थ आज (8 एप्रिल) सकल हिंदू समाज पुरंदर तालुक्याच्या वतीने भव्य 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडी मशीन चौक ते सासवड हा रस्ता सकाळी 7 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

नेमकी मागणी काय आहे?

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात आणि बापदेव घाटात दहशत निर्माण करणाऱ्या तसेच आक्षेपार्ह आव्हाने देणाऱ्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे. पुणे आणि कोंढवा परिसरातील संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी, भिवरी ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे आणि तालुक्यातील कथित लँड जिहाद प्रकरणांची चौकशी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

(नक्की वाचा: Pune News: सोज्वळ चेहरा अन् क्रूर मन! पत्नीला संपवून शुभमने रचला होता खतरनाक प्लॅन; पण पुणे पोलिसांनी...)

मोर्चाचा मार्ग आणि वेळ | Pune Janakrosh Morcha 

सकाळी 10 वाजता हा मोर्चा सासवड येथील शिवतीर्थावरून सुरू होईल. 'चलो सासवड ते कोंढवा' या मोहिमेअंतर्गत ही रॅली सासवड-भिवरी-बापदेव घाट मार्गे खडी मशीन चौक, कोंढवा येथे येणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

वाहतुकीत बदल आणि पर्यायी मार्ग

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडी मशीन चौक ते सासवड दरम्यानची वाहतूक सकाळी 7 वाजेपासूनच वळवण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

(नक्की वाचा: Pune News: नशेत अनेक गाड्यांना ठोकले, मग पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, नंतर भररस्त्यात चोप)

पर्यायी मार्ग: खडी मशीन चौक > उंड्री चौक > मंतरवाडी फाटा > दिवेघाट > सासवड

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

वाहतुकीतील या बदलामुळे सासवडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी दिवेघाटाचा वापर करावा, जेणेकरून मोर्चाच्या मार्गावर होणारी कोंडी टाळता येईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com