Pune News: माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण ही ठरले, 'असा' असेल मार्ग

श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

सूरज कसबे 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक देवस्थानने जाहीर केलं आहे. यात पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भवानी पेठेतच माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करण्याच येणार आहे. शिवाय परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं आहे. तशी प्रक्रिया ही सुरु झाली आहे, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.

या वर्षीचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा 8 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम आळंदीमध्ये राहील. 9 जुलै रोजी पालखी सोहळा आळंदीहुन पुण्याकडे मार्गस्थ होईल. 9 व 10 जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामी राहील. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळयाचे नियोजनावर विचारविनिमय करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते.

Advertisement

नक्की वाचा - Pocket AC: एसीची गरज नाही! गळ्यात घाला 'हे' खास डिव्हाइस, उन्हात मिळेल गारेगार अनुभव, पाहा किंमत

ही बैठक 28 मार्च रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत पुणे येथील मुक्कामाची जागा अपुरी पडत असल्याने पालखी सोहळ्याचे पुण्यातील मुक्कामासाठी अन्य पर्यायी जागांचा विचार करावा अशी सहमती झाली. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील मुक्काम श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ येथे होत असतो. दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने तसेच भवानीपेठ येथील अपुरी जागा याचा विचार करून 2010 पासून पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण बदलण्याची मागणी समाजाकडून होत होती. त्या वेळी पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवावा अशी सूचना समाजातून आली होती.

नक्की वाचा - Milk Prices Hike: अमूल दूध महागले! नवे दर 14 मे पासून संपूर्ण देशात लागू, जाणून घ्या किती झाली दरवाढ

पुढे 2022 मध्ये संस्थानच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाबरोबर संस्थानच्या पुणे येथील कार्यालयात बैठक घेतली. भवानीपेठ येथे पालखी सोहळा आल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता पालखी, पालखीबरोबरील मानकरी, सेवेकरी, कर्मचारी तसेच वीणेकरी आणि दिंडीतील वारकरी यांना मंदिरात आरतीसाठी उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. वारकऱ्यांना ढकलाढकली केली जाते. त्यामुळे मंदिराचा विस्तार करणेबाबत सूचना केली होती. अशा सर्व बाबींची चर्चा या बैठकीत झाली. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी भवानीपेठेत सर्व सोई देण्याचे मान्य केले. त्यानंतर यावर्षीचा माऊलींचा मुक्का हा भवानी पेठेतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world