जाहिरात

Pune News : 15 जूनपासून राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार? शिक्षण विभागाची मोठी माहिती

राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. 

Pune News : 15 जूनपासून राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार? शिक्षण विभागाची मोठी माहिती

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. 

यंदा शाळा कधी होणार सुरू? 

अखेर शाळा सुरू होण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून 15 जूनलाच शाळेची घंटा वाजणार असल्याची माहिती आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असून शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाइन सुरू होणार असल्याच्या चर्चांना शिक्षण विभागाने पूर्णविराम देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन शिक्षणातूनच होणार आहे. राज्य मंडळाशी संलग्न शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Pune News : हिंजवडीतील प्रसिद्ध IT कंपनी रातोरात बंद; संचालक फरार, 700 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

विदर्भात शाळा कधी सुरू होणार? 

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी पूर्वीचे वेळापत्रक कायम असेल. इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. विदर्भातील शाळा 15 जून ते 29 जून या कालावधीत सकाळी 7 ते 11.45 या वेळेत चालविण्यात येणार आहे. 30 जूनपासून विदर्भासह राज्यातील शाळा नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com