जाहिरात

Pune News : हिंजवडीतील प्रसिद्ध IT कंपनी रातोरात बंद; संचालक फरार, 700 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

हिंजवडी येथील आयटी पार्क फेज २ मधील एका कंपनीने रातोरात गाशा गुंडाळून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune News : हिंजवडीतील प्रसिद्ध IT कंपनी रातोरात बंद; संचालक फरार, 700 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
प्रतिकात्मक फोटो

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : हिंजवडी येथील आयटी पार्क फेज २ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनी अचानक बंद झाल्यामुळे जवळपास ७०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कंपनीला कुलुप लावून संचालक फरार...

२०२५ मध्ये सुरू झालेल्या या जॉब प्लेसमेंट कंपनीने नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५,००० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वसूल केले होते. सुरुवातीला काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी २०२६ पासून कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले. कर्मचाऱ्यांना दिलेले पगाराचे चेकही बँकेत बाऊन्स झाले. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी गेले असता कंपनीला कुलूप असल्याचे आढळून आले.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - लुप्त झालेलं मंदिर पाण्याबाहेर; पुण्याहून 50 किमी अंतरावर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी मोठी गर्दी

संचालक फरार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी हवालदील झालेल्या कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कंपनीच्या संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com