हवेली तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत हलवण्यात आला होता. याची कोणतीही पुर्व कल्पना शिवप्रेमींना देण्यात आली होती. पुतळा हलवल्याची बाब ज्या वेळी शिव प्रेमींच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी हवेली तहसिल कार्यालयाच्या आवारात जोरदार आंदोलन केले. ठिय्या आंदोलन झाले. त्यात मोठा राडा ही झाला. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ पुर्वी असलेल्या ठिकाणी स्थानापन्न केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शिव प्रेमींनी दिली. त्यामुळ प्रशासनाला त्यांच्या मागणी पुढे झुकावे लागले. हलवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणावर आता तहसिल कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्यावतीने खडकमाळ येथे नवीन प्रशासकिय भवन तयार होत आहे. त्यामुळे जुन्या प्रशासकीय इमारतीतले विविध कार्यालये ही नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत केली जात आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृत पुतळा स्थलांतरीत करणेबाबत विनंती केली होती. त्या विनंती प्रमाणे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा हलवण्यात आला.
जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासकिय भवन खडकमाळ इमारतीमध्ये स्थानापन्न करणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात हा पुतळा देण्यात आला. 15 तारखेला हा पुतळा देण्यात आला. हीबाब 17 तारखेला शिवप्रेमी संघटनांच्या लक्षात आली. त्यांनी यावर आक्षेप घेतला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, जन भावनांचा आदर राखुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा पुनश्च हवेली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये स्थानापन्न करणेची कार्यवाही करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
हवेलीच्या तहसिलदारांनी याबाबत पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. दरम्यान पुतळा हलवल्यानंतर शिव प्रेमी संघटना या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी तहसिल कार्यालयाला घेराव घातला होता. शिवाय जोपर्यंत पुतळा पुन्हा आहे त्या ठिकाणी बसवणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमीका घेतली होती. त्याच बरोबर अन्य कार्यालय इथेच असताना फक्त पुतळाच का हलवला गेला असा प्रश्नही या निमित्ताने शिव प्रेमींनी उपस्थित केला. या आंदोलनात खासदार निलेश लंकेही सहभागी झाले होते. त्यांनी ही महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी तातडीने लावला पाहीजे अशी मागणी यावेळी केली.