रेवती हिंगवे, पुणे
पुणे स्वारगेट बस डेपो परिसरात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मागावर पोलीस होती. अखेर 75 तासांनी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रात्री 1 वाजता आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपी दत्तात्रेय गाडेला अटक करुन पुण्यात आणण्यात आलं. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. ससून या शासकीय रुग्णालयात आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सतत गजबजलेल्या स्वारगेट बस डेपो परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांवर देखील दबाव होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी श्वानपथक, ड्रोन कॅमेरे अशा पद्धतीने यंत्रणा राबवली. आरोपीच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरासह अनेक ठिकाणी पोलिसांची शोध मोहीम सुरु होता. 100 ते 150 पोलिसांची फौज ऊसाच्या शेतात देखील आरोपीचा शोध घेत होती.
(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)
शुक्रवारी मध्यरात्री आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. रात्री उशीरा दीड वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडे हा गावातील एका मैदानातून जात असल्याचे दिसले. यानंतर यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा - Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा)
या दरम्यान त्यांच्यात झटापटी झाली. यानंतर या आरोपीला तब्बल 15 मिनिटे पकडून ठेवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुनाट या गावात ग्रामस्थांनी मदत केल्याने आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.