Pune News: महापालिका मुख्य रुग्णालयात सापडल्या दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी स्वच्छतेची ऐशीतैशी

जर इथं दारूच्या बाटल्या आढळून आल्या असतील तर नक्कीच इथं मद्यपी येतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात स्वच्छतेची गंभीर कमतरता दिसून आली आहे
  • रुग्णालयाच्या परिसरात देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या अढळून आल्या
  • रुग्णालयातील वॉर्ड आणि शौचालये तंबाखू-पानमसाल्याने माखलेली असल्याने रुग्णांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सुरज कसबे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य रुग्णालय म्हणून  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे पाहीले जाते. शहरातलं हे महत्वाचं सरकारी रुग्णालय. सर्व सामान्य नागरिक याच रुग्णालयात उपचारासाठी येतात. इथं आपल्याला चांगल्या सोयी सुविधा मिळतील ही त्यांची अपेक्षा असते. पण असं असलं तरी त्यांच्या या अपेक्षा पुर्ण होताना दिसत नाहीत. उपचार सोडा इथं साधी स्वच्छता ही पाहायला मिळत नाही. कहर म्हणजे रुग्णालयाच्या परिसरातच देशी दारूच्या बाटल्यांचा खच ही आढळला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभा राहीला आहे. 

नक्की वाचा - Holi News: होळी दरम्यान प्रदोष काळ अन् चंद्रग्रहण ही!, मग सण नेमका कधी साजरा करायचा? वाचा सर्व डिटेल्स

Advertisement

सरकारी रुग्णालय असलेल्या पिंपरी चिंचवडच्या  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या वास्तूत ठिकठिकाणी गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येत आहेत. तर चक्क देशी दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.  या गंभीर प्रकारामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

नक्की वाचा - Trending News: ना थाटमाट ना बँड-बाजा! 2 IAS अधिकाऱ्यांच्या साध्या लग्नाची मोठी चर्चा

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड आणि स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे इथे पाहणी केली असता, रुग्णालयाच्या भिंती आणि शौचालये तंबाखू-पानमसाल्याने माखलेली दिसून आल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वॉर्डच्या कोपऱ्यात आणि काही ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे रुग्णालय आहे की मद्यपींचा अड्डा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. 

नक्की वाचा - Shocking news: एका रात्रीची बायको! नवरा- नवरीची पहिली रात्र त्याच वेळी बिंग फुटलं अन् थेट लग्नच मोडलं

जर इथं दारूच्या बाटल्या आढळून आल्या असतील तर नक्कीच इथं मद्यपी येतात. शिवाय रुग्णालयाच्या आवाराचा बार सारखा वापर करतात का असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. असं असेल तर रुग्णालयाची सुरक्ष यंत्रणा काय करत असते अशी विचारणा ही आता केली जात आहे. या गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.